रोजगार द्या अथवा विदर्भ द्या!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

प्रत्यक्षात गिरीपेठेतील समितीच्या मुख्यालयासमोर युवकांनी मोठ्या संख्येने पोहोचून  "रोजगार द्या अथवा विदर्भ द्या' ही मागणी बुलंद केली. केंद्र व राज्य सरकारच्या विदर्भ  विरोधी धोरणांचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.

नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे मंगळवारी "रोजगार व विदर्भ  आंदोलन' करण्यात आले. सोशल मीडियावरून आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले  होते. प्रत्यक्षात गिरीपेठेतील समितीच्या मुख्यालयासमोर युवकांनी मोठ्या संख्येने पोहोचून  "रोजगार द्या अथवा विदर्भ द्या' ही मागणी बुलंद केली. केंद्र व राज्य सरकारच्या विदर्भ  विरोधी धोरणांचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. 

लॉकडाऊनच्या काळातही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. "माझे भविष्य-स्वतंत्र  विदर्भ राज्य' असे फलक हातात घेऊन युवक आंदोलनात सहभागी झाले होते. "रोजगार  द्या अथवा विदर्भ द्या', "केंद्र व राज्य सरकारचा निषेध असो' आदी प्रचंड घोषणांनी  परिसर दणाणून गेला.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, युवा  आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनाद्वारे  विदर्भातील बेरोजगारीच्या प्रश्‍नाकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले. 

राम नेवले म्हणाले की, कर्जाच्या महासागरात डूबलेल्या तसेच दिवाळखोरीत निघालेल्या  महाराष्ट्रात आता विदर्भातील तरुणांच्या हाताला काम मिळूच शकत नाही. महाराष्ट्रातील  नेत्यांनी विदर्भातील तरुणांच्या वाट्याच्या नोकऱ्या हिसकावल्या आहेत. कोरोनानंतर  महाराष्ट्र राज्य दिवाळखोरीत निघणार आहे. अशास्थितीत तरुणाईनेच रस्त्यावर उतरून  विदर्भ राज्य मिळवून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

हेही वाचा- 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...
 

आंदोलनात सुयोग निदलावर, अरुण केदार, रेखा निमजे, प्रीती दीडमुठे, गणेश शर्मा,  अनिल केसरवानी, शुभम पौनीकर, प्रशांत जयकुमार, राजेंद्र सतई, प्रशांत मुळे, नितीन  अवस्थी, मनोज झोडे, राहुलकांत सिन्हा, अन्नाजी राजेधर, प्रफुल्ल बोबडे, आदित्य निमजे,  प्रकाश पटले, निखील खेंडे, सुरेश निनावे, शिशुपाल वाळके, दिलीप दडमल, रविकांत  खोब्रागडे, राजेंद्र भूत, रूपेश भोयर आदी सहभागी झाले होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give employment or give Vidarbha!