स्वच्छतेबाबत द्या नावीन्यपूर्ण कल्पना अन्‌ मिळवा बक्षिसे; चंद्रपूर महापालिकेची योजना 

swacha bharat abhiyan
swacha bharat abhiyan

चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन या प्रमुख बाबींवर भर देण्यात आला आहे. शहरी नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, हा यामागील उद्देश आहे. या दोन्ही प्रक्रिया राबविणे सोयीचे व्हावे म्हणून महानगरपालिका प्रशासन नागरिकांकडून नावीन्यपूर्ण कल्पना मागवित आहेत. यातील प्रथम व द्वितीय कल्पनांना पंधरा हजार व दहा हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. 

वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात घन कचऱ्याचे एकत्रीकरण व त्याची विल्हेवाट ही एक मोठी खर्चाची तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्त्वाची समस्या बनली आहे. लोकसहभागाने या समस्येवर तोडगा काढणे काळाची गरज आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिका नागरिकांसाठी नावीन्यपूर्ण स्पर्धा राबविणार आहे. 

या संकल्पना केवळ विचार न राहता प्रत्यक्ष परिणामकारक ठरण्यासाठी याचे काही निकष ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या कल्पना या दीर्घकालीन परिणामकारक ठरणारी असावी. केवळ खर्चिक न राहता भविष्यात आर्थिकदृष्ट्या तग धरू शकणारी असावी. छोट्या-मोठ्या आकाराच्या लोकसंख्येतही परिणाम करणारी असावी तसेच सार्वजनिक जीवनात प्रत्यक्ष वापर करता येऊ शकेल, अशी असावी. 

याशिवाय शहरातील नागरिक किंवा संस्था या स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासंबंधी परिणामकारक उपक्रम स्वयंस्फूर्तीने राबवीत असेल तर त्यांनाही या योजनेंतर्गत दहा व पंधरा हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत. 

काही कल्पना या कालबाह्य 
"स्वच्छ सर्वेक्षण 2020' स्पर्धेच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. कचऱ्यावरील प्रक्रियेसंदर्भातील काही कल्पना या कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे नवनवे तंत्रज्ञान व कल्पनांचा यासाठी विचार करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे ही नावीन्यपूर्ण स्पर्धा राबविली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com