Anil Deshmukh : ओबीसींवर अन्याय न करता मराठ्यांनाही न्याय द्या

सध्या सरकार विनाकारण ओबीसी-मराठा, आदिवासी-धनगर असा संघर्ष निर्माण करत आहे.
Anil Deshmukh
Anil Deshmukh Esakal

गडचिरोली - सध्या सरकार विनाकारण ओबीसी-मराठा, आदिवासी-धनगर असा संघर्ष निर्माण करत आहे. गडचिरोलीत ओबीसींनी महामोर्चा काढला. पण मराठ्यांना आरक्षण नको, अशी त्यांची मागणी नाही. फक्त त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी आहे.

त्यामुळे केंद्रात आणि राज्यातही असलेल्या डब्बल इंजिन सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवून ओबीसींवर अन्याय होणार नाही आणि मराठा समाजालाही न्याय मिळेल, असा प्रयत्न करावा,असे प्रतिपादन माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परीषदेत केले.

गडचिरोली येथे आयोजित कुणबी महामोर्चात सहभागी झाल्यानंतर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत अनिल देशमुख म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक आरक्षणासंदर्भात असलेल्या ५० टक्के सिमेचा दाखला देत त्यावर नकारात्मक निर्णय दिले. शेवटी मराठा समाजाचा न्याय आरक्षणाच्या ५० टक्के अटीत अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.

म्हणून ही मर्यादा १५ ते १६ टक्के एवढी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. त्यानंतर जवळपास २०२१ ते २०२३ या दोन वर्षांत केंद्रीय सरकारतर्फे या दिशेने कोणतीही कृती झाली नाही. या सरकारला फक्त पक्षांच्या फोडाफोडीतच रस आहे. सर्वत्र महागाई, बेरोजगारी वाढत आहे. संपूर्ण देशाची अवस्था दयनीय आहे.

सरकार आता जिल्हा परीषद शाळा खासगी उद्योजकांना देत आहे. याची किंमत या सरकारला २०२४ च्या निवडणुकीत चुकवावी लागेल. या निवडणुकीत महाविकास आघाडीची १०० टक्के सत्ता येईल, असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भ समन्वयक रमण ठवकर, राजेश राऊत, पक्ष निरीक्षक राजेंद्र वैद्य, चिटणीस अॅड. संजय ठाकरे, तालुकाध्यक्ष प्रदीप चुधरी, शहारध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हुसेन शेख, जिल्हा उपाध्यक्ष संजय कोचे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटलांची अवस्था बघवत नाही...

भाजपसह सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांची कथित नाराजी दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले पुण्याचे पालकमंत्री पद हिसकावून अजित पवारांना देण्यात आले. भाजपच्या या महत्त्वाच्या मोठ्या नेत्याची दयनीय अवस्था बघवत नाही. बाहेरून येणारे कोहळा घेत आहेत आणि भाजपच्या लोकांना आवळा देण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनीही आपल्या राजकीय भविष्याचा विचार करावा, अशी कोपरखळी अनिल देशमुख यांनी पत्रकार परीषदेत मारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com