जनतेच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देऊ ः राज्यमंत्री डॉ. फुके

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

गोंदिया ः पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास व सबका विश्‍वास' या ब्रीदवाक्‍याप्रमाणे कार्य करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीकरिता कामाला लागावे. मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी मोठी आहे. या अल्प काळात मोठे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, प्रलंबित कामे व जनतेची समस्या सोडविणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले. येथील पोवार बोर्डिंग येथे भाजपची विस्तारित जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.

गोंदिया ः पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास व सबका विश्‍वास' या ब्रीदवाक्‍याप्रमाणे कार्य करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीकरिता कामाला लागावे. मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी मोठी आहे. या अल्प काळात मोठे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, प्रलंबित कामे व जनतेची समस्या सोडविणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले. येथील पोवार बोर्डिंग येथे भाजपची विस्तारित जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. या वेळी खासदार सुनील मेंढे, आमदार संजय पुराम, आमदार विजय रहांगडाले, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, शिशुपाल पटले, प्रदेश उपाध्यक्ष रमेश कुथे, माजी आमदार केशव मानकर, भेरसिंह नागपुरे, खोमेश रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य विनोद अग्रवाल आदी उपस्थित होते. या वेळी राज्यमंत्री फुके, खासदार सुनील मेंढे व अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्त झालेले आमदार संजय पुराम यांचा जिल्हा भाजपतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. फुके म्हणाले की, आठवड्यातील तीन दिवस जिल्ह्यात देणार असून, दर शनिवारी जनता दरबार घेतला जाईल. जनतेच्या समस्या सोडविल्या जातील. प्रत्येक कार्यकर्त्याने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी काम करावे. या वेळी कॉंग्रेसचे विक्की बघेल यांच्यासह रतनारा व काटी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give priority to solving public problems: Minister of State Phuket