उद्दिष्ट 150 कोटीचे; वाटप पाच कोटी! 

उद्दिष्ट 150 कोटीचे; वाटप पाच कोटी! 

सोलापूर : मोठा गाजावाजा करत मराठा समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ काढले. मात्र जनजागृती अभावी हे मंडळ कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत. या महामंडळांतर्गत 2018- 19 साठी 150 कोटीचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बॅंकाने दिले. त्यातील फक्त चार कोटी 95 लाख 26 हजार 263 चे कर्ज वाटपात यश आले आहे. बॅंका कर्ज वाटपासाठी तयार आहेत, परंतु परिपूर्ण प्रकरणे नसल्याने नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे. 

राज्य सरकारकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत मराठा युवकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 लाखांपर्यंत बिगरव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी संबंधिताने वेळेत हप्ता भरणे आवश्‍यक आहे. यात अपवाद वगळता वेगवेगळी कारणे सांगत बॅंका कर्ज देण्यासाठी हात आकडता घेत आहेत. जाचक अटींमुळे प्रकरणे वेळेत मंजुर होण्याचे प्रमाणही अल्प आहे. योजनेचा लाभ घ्यायचा म्हणून काहीजण व्यवसायापेक्षा जादा रक्कमेची मागणी करत आहेत. त्यात प्रकरणे नामंजूर होत आहेत, असे बॅंकाकडून सांगितले जात आहे.

काहीजण महामंडळाकडून कर्ज मंजुरीचे ऑनलाइन पत्र घेतात. परंतु बॅंकेत लागणारी आवश्‍यक कागदपत्रे देत नाहीत. महामंडळाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांने प्रथम योग्य तो व्यवसाय निवडणे आवश्‍यक आहे. त्या दृष्टीने कार्यक्षेत्रातील बॅंकेत परिपूर्ण प्रकरण सादर करणे गरजेचे आहे. यात लाभार्थ्यांचे पुरेसे प्रबोधन नसल्याने उभारण्यात येणारा व्यवसाय व त्यासाठी लागणारे भांडवल यात तपावत पडत आहे. काहीजण बिगरव्याजी कर्ज म्हणून जादा रक्कमेची मागणी करतात. त्यामुळे प्रकरणे नामंजूर होत आहेत. 

महामंडळांतर्गत कर्ज घेताना लाभार्थ्यांने कार्यक्षेत्रातील बॅंकेकडे प्रकरण सादर करणे आवश्‍यक आहे. परिपूर्ण प्रकरणास कर्ज देण्यासाठी बॅंका तयार आहेत. योग्य प्रकरण असल्यास त्वरित मंजूर करण्याच्या सूचना सर्व बॅंकांच्या व्यवस्थापकांना दिल्या आहेत. यासाठी तालुकास्तावर बैठका घेतल्या आहेत. योग्य व्यवसायाची निवड करून त्यात लाभार्थ्यांने स्वत: काही भागभांडवलाची गुंतवणूक करणे अवश्‍यक असते. मात्र, जागृती अभावी ती गुंतवणूक होत नाही. खासगी बॅंकानाही कर्ज मंजूरीसाठी उद्दिष्ट दिले आहे. 
- आर. डी. चंदनशिवे, व्यवस्थापक, लीड बॅंक, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com