esakal | पुलावरून विद्यार्थ्याची उडी; चंद्रपूर जिल्ह्यात आढळला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

पुलावरून विद्यार्थ्याची उडी; चंद्रपूर जिल्ह्यात आढळला मृतदेह

पुलावरून विद्यार्थ्याची उडी; चंद्रपूर जिल्ह्यात आढळला मृतदेह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील राजूर कॉलनी येथे काकांच्या घरी वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्याने शनिवारी (ता. ४) वर्धा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील तेलवासा गावाजवळील नदीत सेामवारी सकाळी (ता. सहा) आढळून आला. समेध तारक वाघमारे (वय १७) असे मृताचे नाव आहे.

समेध लोकमान्य टिळक महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो राजूर कॉलनी येथील काकांच्या घरी वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी समेध याने बाहेर जाण्यासाठी स्कूटरची किल्ली मागितली आणि घराबाहेर पडला. बराचवेळ लोटूनही तो घरी परतला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता रविवारी वरोरा मार्गावरील वर्धा नदीच्या पाटाळा येथील पुलावर दुचाकी आढळून आली.

हेही वाचा: गृहमंत्र्यांच्या नावे खंडणी; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

नदीच्या काठावरून त्याची शोध मोहीम सुरू केली असता सोमवारी (ता. सहा) सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील तेलवासा या गावाजवळ नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. समेधने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.

loading image
go to top