Maharashtra Vidhansabha 2019 गोयल म्हणतात, भाजपला शतप्रतिशत यश

file photo
file photo


नागपूर  : देशातील निवडणुकांमध्ये पूर्वी बहुमताची चर्चा व्हायची, नंतर दोनतृतीयांश बहुमताची संकल्पना पुढे आली. आत 80 टक्के जागांसह भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या "डबल इंजिन'ने जनतेची सेवा केली आहे. त्याबळावर महाराष्ट्रात भाजपला शतप्रतिशत यश मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय वाणिज्य व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
केंद्रात विरोधी पक्षनेता पदासाठी आवश्‍यक संख्या कोणत्याही विरोधी पक्षाला गाठता आली नाही. महाराष्ट्रातही त्याची पुनरावृत्ती होईल. भाजपात वेळोवेळी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात येतात. भाजपचा सच्चा कार्यकर्ता कधीही पदाच्या मोहात न पडता कार्य करीत असल्याचे त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. शिस्तप्रिय भाजपात कुणीही बंडखोर नाही. बंडखोरांसोबत जनता नसतेच, यामुळे कुणी बाहेर गेले असेल तर तेसुद्धा परत येतील. संघ मुख्यालयात येऊन कार्याची प्रेरणा मिळत असते. आजही सर संघचालकांसोबत चर्चा झाली आणि अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा काही परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर जाणवत असला तरी अर्थमंत्री सीतारामन आणि केंद्र सरकार लक्ष्य निश्‍चिती करून पाऊले उचलित आहे. त्याबळावर अर्थव्यवस्थेला गती मिळून विकासदर 8 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचेल.
शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करीत असल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर ते म्हणाले, प्रत्येक पक्ष आपली शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाने प्रयत्न केल्यास युतीलाच अधिक मजबुती मिळेल. पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, माजी खासदार अजय संचेती, आमदार अनिल सोले, प्रवक्‍त्या अर्चना डेहनकर, चंदन गोस्वामी उपस्थित होते.
ब्रॉडगेज मेट्रोचा निर्णय महिनाभरात
नागपुरात ब्रॉडगेज मेट्रो चालविण्यासंदर्भातील प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे आला आहे. महिनाभरात या प्रस्तावावर निर्णय घेण्याची सूचना केली आहे. याशिवाय नाशिक येथे मिनी मेट्रो चालविण्याचा मनोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याच धर्तीवर वाराणशीतही प्रकल्प साकारण्यासाठी डीपीआर तयार होणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com