वीटभट्टी व्यावसायिकाकडे कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच, १० हजार घेताना महिला अधिकाऱ्याला अटक

Woman Revenue Officer Caught : ही कारवाई विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. २३) अर्जुनी मोरगाव येथे केली. गायत्री बोरकर (वय ४१) असे अटक करण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव आहे.
 Woman Revenue Officer Caught Taking ₹10,000 Bribe

Woman Revenue Officer Caught Taking ₹10,000 Bribe

esakal

Updated on

गोंदिया : विटभट्टी व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना निमगाव (ता. अर्जुनी मोरगाव) येथील महिला ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. ही कारवाई विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. २३) अर्जुनी मोरगाव येथे केली. गायत्री बोरकर (वय ४१) असे अटक करण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार विटभट्टीचा व्यवसाय करतात. या व्यवसायासाठी लागणारी माती ते गावातील विविध शेतकऱ्यांकडून आणतात. मार्च २०२५ मध्ये ग्राम महसूल अधिकारी गायत्री बोरकर यांनी तक्रारदारावर मातीचे अवैध उत्खनन करत असल्याचा आरोप करत त्यांच्याकडून ३३ हजार रुपये उकळले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com