Crime News: प्रेमविवाहाचा शेवट झाला दुर्दैवी; पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीने उचललं टोकाचं पाऊल

Crime News
Crime Newsesakal

सडक अर्जुनी: प्रेमविवाह झालेल्या जोडप्याने दोन दिवसाआड रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील सौंदड येथे उघडकीस आली.

प्रेमविवाहाचा भंग झाल्याने तणावात दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले. पत्नी डिलेश्वरी दिगंबर भुसारी (वय १९) हिने ३१ मे रोजी, तर पती दिगंबर श्रावण भुसारी (वय २३, दोघेही रा. सौंदड) याने शुक्रवार, २ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आत्महत्या केली.

Crime News
lok sabha 2024: रिटायर शिंदे पुन्हा मैदानात! सोलापूर लोकसभेचे सर्वाधिकार सुशीलकुमार शिंदेंकडे

जानेवारी २०२३ मध्ये डिलेश्वरी व दिगंबर भुसारी यांनी प्रेमविवाह केला. त्यांचा संसार सुरळीत सुरू असताना काही दिवसांपूर्वी त्यांच्यात खटके उडायला सुरवात झाली. दोघेही एकत्र राहात असले तरी एकमेकांसोबत बोलत नव्हते. दोघेही तणावात राहात होते.

Crime News
Accident News: ह्रदय हेलवणारी घटना! वडिलांचे पार्थिव गावाकडे घेवून जाताना मुलाचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, डिलेश्वरी हिने ३१ मे रोजी पहाटे २ ते २.३० च्या सुमारास सौंदड रेल्वे स्थानकाजवळ गोंदिया- चांदाफोर्ट रेल्वेसमोर आत्महत्या केली. त्या पाठोपाठ पती दिगंबर यानेसुद्धा शुक्रवार, २ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सौंदड रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

दोघांच्याही प्रेमविवाहाचा असा अंत झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगंजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आनंद दामले, पोलिस नायक संजय चकोले, पोलिस शिपाई महेश धुर्वे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com