तिरोडा : फळबागेची पाहणी करताना शेतकरी पटले. 
तिरोडा : फळबागेची पाहणी करताना शेतकरी पटले. 

शेतकऱ्याची यशोगाथा; भाजीपाला, फळपीक लागवडीला दिले प्राधान्य 

तिरोडा (जि. गोंदिया) : सातोना येथील शेतकरी भोजराम पटले यांच्याकडे 2 एकर शेतजमीन आहे. ही शेती ओलिताखाली असल्याने त्यांनी धानपिकाला बगल देत तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांच्या मार्गदर्शनाखाली फळबाग, औषधी वनस्पती, रक्‍तचंदन, सागवान इत्यादी पिकांची लागवड केली आहे. त्यातून आपल्या उन्नतीचा मार्ग शोधला आहे. 

शेतकरी पटले यांनी एक नवीन दृष्टी ठेवून कमी खर्चात जास्तीत जास्त नफा कसा कमविता येईल, या उद्देशाने प्रायोगिक तत्त्वावर दोन एकरात फळबाग, आंबा, अनार, मोसंबी, चिक्‍कू, पेरू, संत्रा, ऍपल बोर, रक्‍त चंदनाची 450 झाडे व आंतरपीक म्हणून हळद व तूरपिकाची लागवड केली आहे. त्यांच्याजवळ असलेल्या दोन एकर क्षेत्रात विविध पिके घेण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. 


अडीच लाखांचा निव्वळ नफा 

शेतकऱ्याने विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून नावीन्यपूर्ण उपक्रमाकडे लक्ष वेधले आहे. या नंतर स्वतःकडील पूर्ण शेतात अशा प्रकारच्या पिकांची लागवड करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला आहे. शेतकरी भोजराम पटले यांनी दोन एकरांतील शेतात जवळपास 450 रक्‍तचंदनाच्या झाडांची लागवड केली आहे. त्यांना फळबागेतून खर्च वजा 2.5 लाख निव्वळ नफा झाला आहे. 


धान उत्पादन शेतीला बगल 

शेतकऱ्याने कृषी विभागाच्या तांत्रिक सल्ल्याच्या साहाय्याने फळबाग, रक्‍तचंदन उत्पादनासोबत आंतरपीक हळद व तूर पिकाची लागवड केली आहे. उन्हाळी पीक करडईची लागवड प्रयोगिक तत्त्वावर घेणार आहेत. या उत्पादनातून त्यांना मासिक 25 हजार रुपये नफा मिळणार आहे. त्यांचा कुटुंबातील सर्व सदस्य शेतात स्वतः काम करीत आहेत. पारंपरिक धान उत्पादन शेतीला बगल देऊन या उपक्रमातून त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 


शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम करावा 
पारंपरिक धान उत्पादन शेतीला बगल देऊन भोजराम पटले यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग लागवड केली आहे. अन्य शेतकऱ्यांनीही अशा नावीन्यपूर्ण उपक्रमातून फळबाग, रक्‍तचंदन, आंतरपीक हळद, तूर, करडई यासारख्या बाबींचा अवलंब करावा. 
- मंगेश वावधने, तालुका कृषी अधिकारी, तिरोडा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com