कोणी सोने विकत घेता का होऽऽ

No ginning mill in Gadchiroli
No ginning mill in Gadchiroli

सिरोंचा (गडचिरोली) : शेतकऱ्यांना भरभरून धन मिळवून देणारा पांढराशुभ्र कापूस पांढरे सोने म्हणून ओळखला जातो. कापूस पिकासाठी सिरोंचा तालुका प्रसिद्ध आहे. परंतु, येथे जिनिंग मील नसल्याने शेतकऱ्यांचे हे पांढरे सोने परराज्यात कवडीमोल भावाने विकले जात आहे. शिवाय या व्यवहारात दलालांकडून शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक करण्यात येत आहे.

सिरोंचा तालुक्‍यातील रेगुंठा, झिंगानूर, टेकडा, बामणी, रंगाय्यापल्ली, कारासपल्ली, सिरोंचा, जानमपल्ली, आरडा, अंकिसा, असरअली या परिसरात 2500 ते 3000 हेक्‍टर शेतीमध्ये कापूस उत्पादन घेतात. तालुक्‍यात अनेक शेतकरी धानशेती सोबतच इतर नगदी पिके घेऊ लागले आहेत. यात मुख्यत: कापूस पिकाकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे.

तालुक्‍यातील शेतकरी दरवर्षी हजारो क्विंटल कापसाचे उत्पादन घेतात. मात्र, सिरोंचा येथे जिनिंग मिल नसल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांना नाइलाजास्तव जवळच असलेल्या तेलंगणा, हिंगणघाट, नागपूर तसेच मध्य प्रदेश राज्यातील पांढुर्णा येथे नेऊन कापूस विकावा लागत आहे. सिरोंचा येथे जिनिंग मिल नसल्याने गावापासून शेकडो किमी अंतरावर असलेल्या तेलंगणा, मध्य प्रदेश राज्यात विक्री केल्याने कापूस नेण्यासाठी गाडीचे भाडे परवडत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

शेतकऱ्यांना लांब अंतर पार करूनही कवडीमोल भावाने कापूस विक्री करून यावे लागते. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. शेतामध्ये वर्षभर कष्ट करून पिकविलेला कापूस दलालांच्या हातात देऊन शेतकरी परत येत असल्याने शेतात गुंतवणूक केलेली रक्कमही त्यांच्या हातात येत नाही. तसेच शेतकरी दलालांच्या अडकित्त्यात अडकून त्यांची पिळवणूक होत आहे.

आर्थिक नुकसान

सरकारचा दर पाच ते सहा हजार असताना इकडे दलाल मात्र 4 ते 4500 रुपये एवढ्या अल्प दरात शेतकऱ्यांकडून कापूस घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे बेहाल होत असून, आर्थिक संकटात सापडले आहेत.

आविसं करणार आंदोलन
सिरोंचा तालुक्‍यात जिनिंग मिल असती तर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कापूस येथेच विकला असता व त्यांना चांगला हमीभावही मिळाला असता. शिवाय शेतकऱ्यांना या दलालांपासून मुक्ती मिळाली असती. या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन सिरोंचा येथे जिनिंग मिल मंजूर करून कापूस खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करू. 
- बानय्या जनगाम,
तालुकाध्यक्ष, आदिवासी विद्यार्थी संघटना, सिरोंचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com