मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Gondia Exam Fraud : केंद्र संचालक ए. एस. कोरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैभव सदानंद मटाले, समीर धर्मराज मटाले आणि मयंक ठमकलाल बनोठे अशी या बोगस परीक्षार्थ्यांची नावे आहेत.
Gondia Exam Fraud

Gondia Exam Fraud

ESAKAL

Updated on

गोंदिया तालुक्यातील कावराबांध येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर (केंद्र क्रमांक २१७७) दुसऱ्याच्या नावावर विज्ञान-२ विषयाचा पेपर देताना तीन बोगस विद्यार्थी पकडले गेले. भरारी पथकाने शुक्रवारी (ता. १३) परीक्षा केंद्रावर धडक दिली असता हा प्रकार उघडकीस आला. तिन्ही बोगस विद्यार्थी हे मध्य प्रदेशातील लांजी तालुक्यातील कारंजा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र संचालक ए. एस. कोरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैभव सदानंद मटाले, समीर धर्मराज मटाले आणि मयंक ठमकलाल बनोठे अशी या बोगस परीक्षार्थ्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com