नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुका हा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक तालुका आहे. शेती बरोबरच दुग्ध व्यवसाय व पशुपालन हा जोडधंदा म्हणून येथील शेतकरी व रहिवासी बऱ्याच प्रमाणात करतात..परतीच्या पावसाने येथील धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्याबरोबरच वन्यजीवांच्या वाढत्या संख्येने व गावात वाढलेला मोठ्या प्रमाणावर होत असलेला बिबट्याचा वावर. हे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान करणारे ठरत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा. पिंजरे लावून यांना जेरबंद करा, अशी मागणी होत असताना देखील वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. तालुक्यातील सावरटोला, बोरटोला, भिवखिडकी, सुकळी, खैरी, सुरगांव, चापटी, देवलगाव रामनगर, संजय नगर, कडोली, गोठणगाव, प्रतापगड, दिनकरनगर या परिसरात एक नव्हे तर तीन-तीन बिबट वाघांचा वावर आहे..Nirgudasur Leopard News : निरगुडसरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांची वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावण्याची मागणी.बिबट अनेक बोकड, शेळ्या, कोंबड्या, बिबट फस्त करत आहे. संजयनगर नंतर या परिसरात व तालुक्यात कुठेही मानवी हल्ले बिबट्याने केले नाही. संजय नगर, धमदीटोला येथे एक बालक व एक महिलेचा बळी बिबट्याने घेतला. त्यानंतरचा जन आक्रोश वन विभागाने अनुभवला. परंतु बिबट मानवी वस्ती करतील अशी भीती रहिवाशांना आहे. शेतातील कामे सायंकाळ व्हायचे आताच अर्धवट सोडून शेतकऱ्यांना घरी परत यावे लागते. दिवसभर शेतात जीव मुठीत धरून काम करावे लागते..सुरगाव सारख्या गावात बिबट येणे नित्याचे झाले आहे. गेल्या दोन महिन्यापासून या गावाचं गाव पण हरवला आहे. बिबट्याच्या भीतीने लहान मुलांना ‘बेटा जल्दी सो जाओ नही तो बिबट आ जायेगा‘, असे घरच्या मुलांना सांगावे लागते. यामुळे शोले चित्रपटातील ‘बेटा सो जाओ वरना गब्बर सिंग आ जायेगा‘ या डायलॉगची आठवण येते..बिबट येतो त्या गावात व्हिडिओ कॅमेरे लावण्यापलीकडे वन विभागाकडून ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. याबाबत वन विभागाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत? तेच कळायला मार्ग नाही. या प्रश्नांवर वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बोलायला, प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत. याकडे लोकप्रतिनिधींचेही लक्ष नाही. शेतकरी, पशुपालक यांच्या विषयी अधिकारी, लोकप्रतिनिधी गंभीर नसून, संवेदनशीलतेने बघतच नाही, अशा तक्रारी लोकांच्या आहेत..शेतात प्रकाश व्यवस्था करावीबिबट्याचा संचार प्रामुख्याने सूर्यास्तापूर्वी अर्धा तास ते सूर्यास्तानंतर अर्धा तास, तसेच सूर्योदयानंतर अर्धा तास ते सूर्योदयापूर्वी अर्धा तास या काळात सर्वाधिक असतो. टॉर्चचा वापर, मोबाईल प्रकाश, लाकडी काठी वा हूक सोबत ठेवावा. शक्य असल्यास शेतात सौरदिवे किंवा मोशन सेन्सर दिवे बसवावेत, ज्यामुळे बिबट्याचा संचार लवकर लक्षात येतो. तसेच, जर परिसरात बिबट्याचे पाऊलखुणा, माती खोदलेली जागा प्राण्यांचे अवशेष आढळले, तर त्वरित वनविभागाला माहिती द्यावी..जागृती व प्रशिक्षणवनविभागाने बिबट वाघाच्या सवयी विषयी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन जागृती करावी. बिबट्या दिसल्यास घाबरू नये, योग्य अंतर राखावे व तातडीने अधिकाऱ्यांना कळवावे. शेतात एकट्या दुकट्याने जाऊ नये समूहाने जावे. मोबाईलवर गाणे वाजवत जावे. बिबट्या बहुधा लहान उंचीच्या व्यक्ती किंवा बसलेल्या माणसावर हल्ला करतो. त्यामुळे गवत कापणाऱ्या महिला, लहान मुले, अथवा अंधारात शेतावर जाणारे व्यक्ती जास्त धोक्यात असतात. अनेकदा बिबट्या कुत्र्याच्या शोधात घराजवळ येतो, कारण कुत्रा हे त्याचे आवडते भक्ष्य असते..मला शेत जमीन नसल्यामुळे पशुपालन हाच माझा मुख्य व्यवसाय आहे. मागील महिन्यात बिबट्याने माझ्या दोन शेळ्या व एक बोकड ठार मारला. यावरच माझा उदरनिर्वाह होतो. सरकारने मला आर्थिक मदत द्यावी. बिबट्याचा बंदोबस्त करावा. जेणेकरून आम्ही निर्भीडपणे पशुपालनाचा व्यवसाय करू.-यशोदा डोये,महिला पशुपालक सावरटोला.शेतीवर यंदा निसर्गाचा कोप झाला. १६ ऑक्टोबरला माझ्या पोल्ट्री फार्म मध्ये बिबट्याने प्रवेश करून ७० कोंबड्या फस्त केल्या. यात साठ हजार रुपयांचे नुकसान झालं. ना शेतीचे पैसे मिळाले ना वन विभागाकडून आर्थिक मदत. कसे जगावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.-विजय मुनेश्वर,पोल्ट्री फार्म मालक, सावरटोला..बिबट्याचा वावर असलेल्या गावात जनजागृती सुरू आहे. वन विभागाचे गस्तीपथक गावात रात्रीला गस्ती करत आहेत. बिबट्याच्या हालचाली दिसून आल्यास, नागरिकांनी वन विभागाशी संपर्क करावा. तातडीच्या उपाययोजना केल्या जातील.-अविनाश मेश्राम,साहाय्यक वनसंरक्षक,प्रादेशिक वन विभागनवेगावबांध..आमच्या गावात बिबट येणे ही नित्याची बाब झाली आहे. अनेक शेळ्या, बोकड, कोंबड्या फस्त केल्या आहेत. सायंकाळ झाली की सर्व गाव स्वतःला घरात कोंडून घेते. रात्र बिबट्याच्या भेटीत काढावी लागते. दिवस उजाडेपर्यंत जिवात जीव नसतो. वन विभागाने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.सीमा शेंडे,ग्रामपंचायत सदस्य.सुरगाव..Nirgudasur Leopard News : निरगुडसरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांची वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावण्याची मागणी.संजय नगरची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दक्षता घेतली जात आहे. वनक्षेत्र गोठणगाव अंतर्गत रामनगर, संजयनगर, दिनकरनगर तसेच गोठणगाव मध्ये दररोज गस्त चालू आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी संजय नगर, कडोली, गोठणगाव, परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत. दिवसा व रात्री गस्तीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.-मिलिंद पवार, वनपरिक्षेत्राधिकारी, प्रादेशिक वन क्षेत्र गोठणगाव..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.