गोंदियाचे भावी नगराध्यक्ष कोट्यधिशांच्या रांगेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

गोंदिया - गोंदिया नगर परिषदचे निवडणूक आठ जानेवारीला होत आहे. याकरिता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी आपले शपथपत्र निवडणूक अधिकारी यांना सादर केले. यात अनेक उमेदवार हे कोट्यधिशांच्या रांगेत असल्याचे दिसून येते. म्हणजेच गोंदियाचा भावी नगराध्यक्ष हा कोट्यधीश असणार, हे स्पष्ट झाले आहे.

गोंदिया - गोंदिया नगर परिषदचे निवडणूक आठ जानेवारीला होत आहे. याकरिता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी आपले शपथपत्र निवडणूक अधिकारी यांना सादर केले. यात अनेक उमेदवार हे कोट्यधिशांच्या रांगेत असल्याचे दिसून येते. म्हणजेच गोंदियाचा भावी नगराध्यक्ष हा कोट्यधीश असणार, हे स्पष्ट झाले आहे.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार छैलबिहारी अग्रवाल यांच्याकडे ११ लाख ३३ हजार ९८६ रुपये ही जंगम मालमत्ता असून स्थावर मालमत्ता ८० लाख रुपयांची आहे. त्यांच्यावर १० हजार ७१० रुपये थकीत आहेत. तर भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशोक इंगळे हे पदवीधारक आहे. त्यांच्याकडे चार लाख ६९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर स्थावर मालमत्ता ४० लाख रुपयांची आहे. त्यांच्याकडे ४७ हजार ६०४ रुपये थकीत आहेत. ज्योती उमरे यांच्याकडे २१ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहेत. तर स्थावर मालमत्ता ३ लाख ५० हजार रुपयांची आहे. त्यांच्यावर ६ लाख १४ हजार ४७८ रुपये थकीत आहेत. सुरेंद्र खोब्रागडे हे उच्चशिक्षित आहेत. त्यांच्याकडे १ लाख ३० हजार २१२ रुपयांची जंगम मालमत्ता आहेत. तर स्थावर मालमत्ता ६ लाख रुपयांची आहे. अशोक गुप्ता यांच्याकडे जंगम मालमत्ता ८० लाख ९४ हजार ३७९ रुपयांची आहे. तसेच स्थावर मालमत्ता-१ लाख ५३ हजार रुपयांची आहे. त्यांच्याकडे ७१ लाख ५२ हजार ८२७ रुपये थकीत आहेत. गोवर्धन जयस्वाल यांच्याकडे जंगम मालमत्ता ६१ हजार रुपयांची आहे. त्यांच्यावर ४०० रुपये थकीत आहेत. राकेशसिंह ठाकूर यांच्याकडे जंगम मालमत्ता ११ लाख ८९ हजार ५३१ रुपयांची आहेत. तर स्थावर मालमत्ता ३० लाख रुपयांची आहे. 

नरेंद्र तिवारी यांच्याकडे दोन लाख ३४ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. सतीश बन्सोड हे उच्चशिक्षित आहेत. २३ लाख ७२ हजार ६७७ रुपयांची जंगम मालमत्ता तर स्थावर मालमत्ता १५ लाख रुपयांची आहे. ४३ हजार रुपये थकीत असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. किशोर भोयर यांच्याकडे जंगम मालमत्ता- ९ लाख १ हजार ८०० रुपयांची आहे. तर स्थावर मालमत्ता ८० हजार रुपयांची आहे. ४८९ रुपये थकीत आहेत. हरिराम मोटवानी यांची जंगम मालमत्ता २२ लाख ९३९ रुपयांची आहे. तसेच स्थावर मालमत्ता २१ लाख ६१ हजार ७२२ रुपयांची आहे. एक हजार ६१५ रुपये थकीत आहेत. 

पुरुषोत्तम मोदी यांच्याकडे जंगम मालमत्ता ३९ लाख ३५ हजार १६२ रुपयांची आहे. तर स्थावर मालमत्ता १९ लाख ५३ हजार रुपयांची आहे. २२ लाख १३ हजार १२४ रुपये त्यांच्याकडे थकीत आहेत. पंकज यादव यांच्याकडे ८२ लाख ५९ हजार ७११ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. 

मात्र, त्यांच्याकडे १४ लाख ३९ हजार ५० रुपये थकीत आहेत. दुर्गेश्‍वरकुमार रहांगडाले यांच्याकडे जंगम मालमत्ता ४८ लाख २१ हजार ४१६ रुपयांची आहे. तर १ लाख ३ हजार १२४ रुपये थकीत आहेत.

Web Title: gondia mayor in crore line