गोंदिया दुग्ध संघाचे संचालक मंडळ अपात्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

गोंदिया : येथील जिल्हा दुग्ध संघ दूध उत्पादकांकडून शासकीय दराप्रमाणे दूध खरेदी न करता कमी दरात खरेदी करीत असल्याचा ठपका ठेवत नागपूर येथील सहकारी संस्थेचे विभागीय उपनिबंधक एस. एन. क्षीरसागर यांनी संचालक मंडळ सहा वर्षांकरिता अपात्र ठरविले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, जिल्हा दुग्ध संघ जेव्हापासून अस्तित्वात आला, तेव्हापासून राजकुमार कुथे अध्यक्ष आहेत. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असलेल्या कुथे यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

गायीच्या दुधाकरिता 27 रुपये तर, म्हशीच्या दुधाकरिता 36 रुपये प्रतिलिटर असा दर शासनाने ठरवून दिला आहे. हा दर प्राथमिक दूध संस्था व सभासद शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. असे असताना संघ तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत संचालक मंडळाने संस्था व शेतकऱ्यांना 5 रुपये कमी म्हणजे 22 रुपये दराने गाईच्या दुधाचे दर दिले. त्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार दूध संस्था व सभासद शेतकऱ्यांनी विभागीय उपनिबंधकासह जिल्हाधिकारी व शासनाकडे केली होती. याउपरही दूध संघ लक्ष देत नसल्याने दूध संस्थांनी न्यायालयात धाव घेतली. दूध उत्पादकांच्या तक्रारीच्या आधारे विभागीय उपनिबंधकांनी 21 एप्रिल 2018 रोजी पहिली सुनावणी घेतली. सर्व सुनावणीचा विचार करून संघाला जरी तोटा झालेला असला तरी संघातर्फे दूध संस्था व उत्पादकांना शासन निर्देशित दर देता आलेले नाही. हे दर देणे बंधनकारक असताना त्या निर्णयाचे पालन संघाने केले नाही. याला संचालक मंडळ जबाबदार असल्याचा ठपका ठेवत विभागीय उपनिबंधकांनी सहा वर्षांसाठी संचालकांना अपात्र ठरविले आहे.
अपात्र संचालक
राजकुमार कुथे, रामदयाल पारधी, रमनलाल राणे, लक्ष्मण भगत, शिवशंकर बागडकर, श्रीराम खैरे, सूर्यभान टेंभुरकर, राजाराम लांजेवार, सहसलाल आंबाडारे, निशा राठोड व सपना बांते.

Web Title: gondia news

टॅग्स