कुऱ्हाडीत शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेलाच ठोकले कुलूप

दिलेश्वर पंढराम
मंगळवार, 27 जून 2017

या मागणीकडे सरपंच संघटनेनी पालकांच्या सहकार्याने गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गटशिक्षणाधीकारी यशवंत कावळे यांच्याकडे मागणी केली.

गोरेगाव : शहीद कुऱ्हाडी केंद्र शाळेत गणित, विज्ञान विषयाचा बी.एससी., डी.एड्. शिक्षकांची मागणी १ वर्षापासून करण्यात आली नाही. जिल्हा परिषद शाळांचा पहिला दिवस असल्याने सरपंच संजय आमदे यांनी पालक, विद्यार्थ्यांसह प्रवेशव्दार बंद केले. गटविकास अधिकारी हरिणखेडे, गटशिक्षणाधिकारी यांनी गणित व विज्ञान विषयाचा शिक्षकाची पूर्ण करण्याचे लेखी आश्वासनानंतर कुलूप उघडण्यात आल्याची माहिती सरपंच आमदे यांनी दिली.

शासनाने सेमी-इंग्रजी जिल्हा परिषद शाळेत सुरू केले, तसेच वर्ग ५ ते ८ या वर्गाकरता गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय शिकवणारे बी.एस.सी., डी.एड्. शिक्षकाची पदभरती केली नाही. याउलट समाजशास्त्रात पदवी घेणाऱ्या शिक्षकांना गणित, विज्ञान विषय शिकवणी वर्ग दिले. या शिक्षकांना गणित, विज्ञान विषय हाताळता येत नाहीत, यामुळे विद्यार्थी कमकुवत होत आहेत तालुक्यात १९ विज्ञान शाखेत पदवी घेणाऱ्या शिक्षकाची गरज आहे. या मागणीकडे सरपंच संघटनेनी पालकांच्या सहकार्याने गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गटशिक्षणाधीकारी यशवंत कावळे यांच्याकडे मागणी केली. तसेच यशवंत पंचायत समितीच्या आमसभेत आमदार विजय रहांगडाले यांच्याकडे मागणी केली. पण याकडे आमदारांनी दुर्लक्ष केले यामुळे अधिकारी गब्बर झाले.

शेवटी सरपंच संजय आमदे यांनी गणित, विज्ञान विषयाचा शिक्षकाच्या मागणीकरता शाळेच्या पहिल्याच दिवशी कुलुप बंद करण्या़चा इशारा दिला होता. यामुळे अधिकारी, पोलिसांचा ताफा शाळेच्या प्रवेशव्दारावर दाखल झालेला होता. अनुचित घटना घडू नये याकरता गटविकास अधिकारी हरिणखेडेंनी विज्ञाान शाखेत पदवी घेणाऱ्या शिक्षकाची २८ जून रोजी नियुक्तीचे आदेश काढू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर कुलुप उघडण्यात आले.

Web Title: gondia news teachers shortage school locked