'भविष्यात काही समस्या उद्‌भवल्यास मी स्वत: जबाबदार राहील', विद्यापीठाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये रोष

Gondwana University pressure on students for fill the guarantee letter
Gondwana University pressure on students for fill the guarantee letter

नागपूर : कोरोनामुळे सर्वच क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कुणाचे किती नुकसान झाला याचा अंदाज आपण लावू शकत नाही. यातून सावरण्याचा मात्र सर्वजण प्रयत्न करीत आहे. शिक्षणाचे काय, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत होता. शाळा, कॉलेज सुरू केले तर मुलांना कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती होती. यामुळे सरकारने काही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबत गुणदान करण्याचे अधिकार विद्यापीठांना दिले आहे. मात्र, एका विद्यापीठाचा भलताच प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे विद्यार्थीही भोचक्‍के झाले आहेत.

राज्य सरकारने अंतिम सत्र व वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांना गुणदान कसे करावे, याचा निर्णय विद्यापीठांवर सोपवला आहे. तसेच मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील, वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी घेण्याचा आदेश सरकारने विद्यापीठांना दिला आहे. त्यानुसार राज्यातील काही विद्यापीठांनी सरसकट हमीपत्र तयार केले. आता हे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून भरून घेतले जात आहेत.

विदर्भातील गोंडवाना विद्यापीठाने काढलेल्या हमीपत्रामधील आशयाने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या हमीपत्रात 'सर्व बाबींचा मी परिपूर्ण विचार केलेला असून, भविष्यात याबाबत काही समस्या उद्‌भवल्यास मी स्वत: जबाबदार राहील' असे नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये रोष वाढत आहे. दुसरीकडे संघटनाही आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.

विभागाच्या निर्णयाला विद्यार्थी कसे जबाबदार?

गोंडवाना विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना पदवी देण्याच्या अनुषंगाने एक हमीपत्र काढून त्यामध्ये भविष्यात पदवीसंदर्भात काहीही समस्या उद्‌भवल्यास स्वत: जबाबदार असल्याचा मजकूर लिहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. विभागाच्या निर्णयाला विद्यार्थी कसे काय, जबाबदार असा प्रश्‍न आता संघटनाही विचारू लागल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com