आनंदवार्ता! तयार होतोय बृहतआराखडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे असलेल्या जमिनीवर येत्या काळात कोणकोणते प्रकल्प तयार करायचे आहे, यासंदर्भात बृहतआराखडा तयार करण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात जमिनीचा प्रकल्पांसाठी वापर करण्यात येणार आहे.

नागपूर विद्यापीठाची जमीन महाराजबागजवळ असलेले मुख्य प्रशासकीय कार्यालय, एलआयटी परिसर आणि कॅम्पस येथे आहे. याशिवाय कामठी येथे साडेआठ एकर जमीन आणि इतर ठिकाणीही विद्यापीठाच्या जमिनी आहेत. या जमिनीवर कुणीही अतिक्रमण करू नये यासाठी काही वर्षांपूर्वीच मालकी हक्काचे बोर्ड लावण्यात आले. दिवसेंदिवस विद्यापीठाचा विस्तार होत असल्याने भविष्यात या जमिनीवर विविध महत्त्वाचे प्रकल्प उभारण्याचा मानस विद्यापीठाचा आहे. तसेच विभागांचे एक्‍सटेंशन आणि यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मिलिंद बाराहाते यांच्या अध्यक्षतेखाली वर्षभरापूर्वीच समिती तयार केली. समितीद्वारे या जमिनीवर भविष्यात नेमके कुठले प्रकल्प तयार करता येईल, यावर अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल विद्यापीठाकडे सादर करण्यात येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news! Creates a Great Plan