आनंदवार्ता! "पेट'साठी एकच परीक्षा

file photo
file photo

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएच.डी. प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेत (पेट) मोठे बदल करण्यात येणार आहे. काही महिन्यांत "पेट-1' व "पेट-2' यांना एकत्र करीत एकच परीक्षा घेण्यावर विद्यापीठाचा विचार सुरू आहे. असे केल्यानंतर 40 गुणांचे ऑब्जेक्‍टिव्ह तर 60 गुणांचे "सब्जेक्‍टिव्ह' प्रश्‍नांचा समावेश करण्यात येईल.
विद्यापीठ अनुदान आयोगाने 2009 साली काढलेल्या दिशानिर्देशावरून विद्यापीठात 2015 साली पीएच.डी.मध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. त्यानुसार पीएच.डी. प्रवेशासाठी "पेट' परीक्षेस सुरुवात करण्यात आली. यानंतर दोन वर्षांपूर्वी विषयनिहाय "पेट-2'ला सुरुवात करण्यात आली. मात्र, "पेट-1'मुळे मानव्यशास्त्रातील विद्यार्थ्यांची पीएच.डी. करणाऱ्यांची संख्या बरीच रोडावली आहे. पाच वर्षांत या शाखेत पीएच.डी. करणाऱ्यांची संख्या जवळपास निम्म्यापेक्षा कमी झाली. परिणामी मानव्यशास्त्र व आंतरशाखीय संशोधन संपुष्टात आले आहे.
विद्यापीठासमोर आता नॅकमध्ये या शाखांमधील संशोधन जेमतेम असल्याचे चित्र आहे. यातूनच पीएच.डी. संशोधनासाठी या शाखेतील विद्यार्थ्यांना प्रवेशाचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी "पेट-1' आणि "पेट-2' एकत्र करण्यावर विद्यापीठ विचार करीत आहे. दोन वर्षांपूर्वी यासाठी डॉ. दिलीप पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती लावली होती. समितीमध्ये असलेल्या विद्यापीठाच्या सदस्यांनी अहवाल तयार केला आहे. या अहवालात पीएच.डी.साठी एकच परीक्षा घेण्यात येईल. यात "पेट-1' व "पेट-2' असे दोन पेपर घेण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com