आनंदवार्ता...  सुपर स्पेशालिटीत आपत्कालीन सेवा लवकरच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

नागपूर : विदर्भच नव्हे तर लगतच्या पाच राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वरदान ठरले आहे. रुग्णहितासाठी सुपरच्या हृदयरोग विभागापासून तर गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी, न्यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी आणि युरोलॉजी विभाग नेहमीच पुढे असतात. परंतु, सुपरमध्ये "कॅज्युअल्टी' नसल्याने रुग्णांना तातडीची उपचार सेवा मिळत नाही. मात्र, अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सुपरमध्ये आपत्कालीक सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. लवकरच आपत्कालीन सेवा सुरू होणार आहे. 

नागपूर : विदर्भच नव्हे तर लगतच्या पाच राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वरदान ठरले आहे. रुग्णहितासाठी सुपरच्या हृदयरोग विभागापासून तर गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी, न्यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी आणि युरोलॉजी विभाग नेहमीच पुढे असतात. परंतु, सुपरमध्ये "कॅज्युअल्टी' नसल्याने रुग्णांना तातडीची उपचार सेवा मिळत नाही. मात्र, अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सुपरमध्ये आपत्कालीक सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. लवकरच आपत्कालीन सेवा सुरू होणार आहे. 
नुकतेच दिवाळीच्या पूर्वसंध्येला मेडिकलशी संलग्नित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागात सायंकाळी पाच वाजता तातडीने डॉ. निकुंज पवार (सीव्हीटीएस) एका ज्येष्ठ नागरिकावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेपूर्वी हृदयरोग विभागप्रमुख डॉ. मुकुंद पवार यांनी एन्जिओग्राफी केली. विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय पराते यांच्यासह येथील तंत्रज्ञांनी तातडीने रक्ताच्या तपासणी केल्याने शस्त्रक्रियेचा मार्ग सुकर झाला. मेडिकल-सुपरचे अधिष्ठाता डॉ. सलज मित्रा यांच्यासह सुपरचे कार्यकारी अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी रुग्णहित लक्षात घेत सुपर स्पेशालिटीत आपत्कालीन सेवा सुरू करण्यासंदर्भात विचारणा केली. विशेष असे की, सुपरच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी आणि हृदयरोग विभागात डीएम विषयाच्या अभ्यासक्रम सुरू झाले. येथील रुग्णसेवेत प्रभावी उपचार होतात. वरिष्ठ निवासी डॉक्‍टर उपलब्ध झाले आहेत. उपचारानंतरची देखभाल व्यवस्था सुपरच्या हृदय (कार्डिओलॉजी) तसेच गॅस्ट्रोएंट्रोलॉजीत उभारण्याची सुविधा आहे. यामुळेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील रुग्ण सुपरमध्ये उपचारासाठी येतात. हृदयरोग चिकित्सा, अतिदक्षता (क्रिटिकल केअर मेडिसिन), आपत्कालीन चिकित्सा (इमर्जन्सी मेडिसिन), अंतस्त्राव विज्ञान (एंडोक्रिनॉलॉजी), जठरांत्रमार्ग रोगचिकित्सा (गॅस्ट्रोएंटोरोलॉजी), मूत्रपिंड विकार चिकित्सा (नेफ्रॉलॉजी), मेंदूविकार चिकित्सा (न्यूरॉलॉजी), मेंदूशस्त्रक्रिया (न्यूरोसर्जरी), फुप्फुसरोग चिकित्सा (पल्मोनोलॉजी), मूत्रसंस्था रोग चिकित्सा (युरॉलॉजी) या विभागात येथे आपत्कालीन सेवा उपलब्ध होतील. 
ते स्वप्न साकार होईल... 
सुपर स्पेशालिटी 1998 पासून रुग्णसेवेत दाखल झाले. 21 वर्षांत हृदयरोग विभागासह गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी, न्यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, श्‍वसनरोग विभाग सुरू करण्यात आले. यामुळे येत्या काळात तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांनी 1998 मध्ये अतिविशेषोपचार उपचार आणि अनुसंधान केंद्र तयार करण्याचा संकल्प उद्‌घाटन करताना सोडला होता. ते स्वप्न आता साकार होईल, असे चित्र दिसत आहे. 
सुपर स्पेशालिटीत आपत्कालीन सेवा सुरू करण्यात येणार आहे. अत्यवस्थ रुग्णांवर 24 तास उपचार होतील. त्यासंदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्यात येणार आहे. लवकरच आपत्कालीन विभाग रुग्णसेवेसाठी सज्ज होईल. तसेच संशोधनाला येथे प्राधान्य देण्यात येईल. यातूनच अतिविशेषोपचार उपचार आणि अनुसंधान केंद्र उभारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. सुपरच्या सर्व विभागप्रमुखांनी आपत्कालीन सेवा सुरू करण्यासाठी होकार दिला आहे. 
-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल-सुपर, नागपूर  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news ... Super specialty emergency services soon