

Ambulance Fire Causes Extensive Workshop Damage
Sakal
गोरेगाव (जि. गोंदिया) : तालुक्याच्या मुंडीपार येथील मांडोबाई वर्कशॉप येथे गुरुवारी (ता. १३) दुपारी दोनच्या सुमारास एका प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका दुरुस्तीला आणण्यात आली. या रुग्णवाहिकेच्या इंजिनसमोरील भागातून धूर निघून अचानक पेट घेतल्याने ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली. वर्कशॉपचे मोठे नुकसान झाले असून नजिकच्या घरांच्या खिडक्यांची काच फुटले.