esakal | अरे हे काय ! शासकीय धान्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची आरोग्य तपासणीच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

dhanayacki vahatuk.jpg

अकोला जिल्हा रेड झोनमध्ये असतानाही अकोट तालुक्यात कोरोनाचा कुठलाही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे स्थानिक प्रशानासहीत नागरिक बिनधास्त आहेत. परंतु, लवकरच प्रशासनाची बेफिकरी चिंतेत बदलणार असल्याचे दिसत आहे. अकोट शहरात इतर ठिकाणाहून धान्य घेऊन येणाऱ्या वाहनचालकामुळे शहर व तालुक्यात आरोग्य बिघडविण्याचे निमित्य ठरू शकतो.

अरे हे काय ! शासकीय धान्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची आरोग्य तपासणीच नाही

sakal_logo
By
मुकुंद कोरडे

अकोट (जि. अकोला) : शासनाच्या वतीने शिधापत्रिका धारकांना रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून धान्याचे वाटप करण्यात येते. त्याकरिता शहरात दाखल होणाऱ्या वाहन चालक व मदतनीस यांची आरोग्य तपासणी गरजेची आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथून तांदूळ तर अकोला व वाशीम येथून गहू घेऊन येणाऱ्या वाहनचालकांची कुठल्याही प्रकारची आरोग्य तपासणी केल्या जात नसल्याचे समजते. 

हेही वाचा-  धोका : एका नगरेवकासह 42 पॉझिटिव्ह, एकाच दिवसातील सर्वाधिक पॉझिटिव्ह अहवाल

जिल्हा आहे रेड झोन मध्ये
वाहनचालकांजवळ स्वतःच्या सुरक्षतेसाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर होतांना दिसत नाही. ज्या शासकीय गोडाऊनवर धान्य जमा केल्या जाते त्या गोडाऊनवर काम करणाऱ्या तब्बल 24 हमाल व संबंधित लिपिक यांना सुद्धा याचा परिणाम भोगण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘त्या’ वाहनचालक व हमालांपासून शहरासह तालुक्यातील नागरिक कोरोनापासून किती सुरक्षीत आहेत हे निदर्शनास येते.

अकोला जिल्हा रेड झोनमध्ये असतानाही अकोट तालुक्यात कोरोनाचा कुठलाही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे स्थानिक प्रशानासहीत नागरिक बिनधास्त आहेत. परंतु, लवकरच प्रशासनाची बेफिकरी चिंतेत बदलणार असल्याचे दिसत आहे. अकोट शहरात इतर ठिकाणाहून धान्य घेऊन येणाऱ्या वाहनचालकामुळे शहर व तालुक्यात आरोग्य बिघडविण्याचे निमित्य ठरू शकतो. हे वाहन शेकडो किलोमीटरचे अंतर कापून तालुक्यात दाखल होतात. वाहनचालक कधीही मास्क किंवा सॅनिटायझरचा वापर करताना आढळले नाहीत. प्रशासनाच्या वतीनेही वाहनचालकांची व गोडाऊनवर काम करणाऱ्या लिपिक व हमालांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे.

क्लिक करा- हे काय ? चक्क दोन पोलिसांमध्येच झाली फ्रिस्टाईल, एक होता वर्दीवर तर दुरसा सुटीवर

वाहनचालकांची आरोग्य तपासणी आवश्‍यक
शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून बाहेर जिल्ह्यातून अकोट तालुक्यात राशनचे धान्य घेऊन येणाऱ्या वाहनचाकांसह स्थानिक शासकिय गोडाऊनवर काम करणाऱ्या हमालांची आरोग्य तपासणी होणे आवश्‍यक आहे.
-प्रदीप वानखडे, माजी जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

आठवड्यातून एकवेळा गोडाऊन होते निजर्तुंकीकरण
शरहात दाखल होणाऱ्या या वाहनांची न.प.च्या सॅनिटायझेनच्या वाहनाव्दारे निजर्तुंकीकरण करण्यात येते. त्याचप्रमाणे आलेल्या वाहनावरील चालकांना गोडाऊनवर खाली न उतरण्याच्या सूचना संबंधित गोडाऊन संचालकांना देण्यात आल्या आहेत. आठवड्यातून एकवेळा गोडाऊन आत व बाहेरून निजर्तुंकीरण करण्यात येते.
-राजेश गुरव, प्रभारी तहसीलदार, अकोट