सरकारी कर्मचाऱ्यांचा आज संप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : महसूल कर्मचारी, ग्रामसेवक संपावर असल्याने आधीच गाव पातळीवर नागरिकांची अडचण होत आहे. त्यात आणखी भर पडणार आहे. सोमवारला जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व विभागाचे कर्मचारी संपावर आहेत. यामुळे संपूर्ण यंत्रणाच ठप्प पडण्याची चिन्ह आहेत.

- या आहेत मागण्या
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्यात.
खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करून, कंत्राटी
कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे.
केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावे.
अनुकंपा भरती तत्काळ करावी.
शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये.
शिक्षण व आरोग्यावर जीडीपीच्या टक्के खर्च करण्यात यावा.

कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या न्याय आहेत. यापूर्वी अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र, शासन पातळीवर त्याचा विचार झाला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव हा संप पुकारावा लागत आहे.
- संजय धोटे, नेते, महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समिती.

या संघटनांचा राहणार सहभाग
जि. प. कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, महा. राज्य. प्राथमिक शिक्षक संघ, म. रा. प्राथ. शिक्षक समिती, जि. प. कर्मचारी युनियन, म. रा. जि. प. आरोग्यसेवा कर्मचारी संघटना, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, म. रा. कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना, म. राज्य. जि. प. लेखा कर्मचारी संघटना, म. हा. जि. प. लिपिकवर्गीय युनियन, म. रा. जुनी पेन्शन हक्क संघटना, सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटना.

कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे आवाहन
या संपात जास्तीत-जास्त कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन संप यशस्वी करण्याचे आवाहन कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे व सचिव नरेंद्र धनविजय यांनी केले.

या संघटनांचा संपात सहभाग नाही
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी कल्याण महासंघाचा आरोप आहे की, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, आरक्षण व मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उचलल्यानंतर संपात सहभागी संघटना कधीही सहकार्य करीत नाही. त्यामुळे कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने संपात सहभागी न होता कर्मचाऱ्यांनी आपल्या कामावर हजर राहण्याचे आवाहन केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे, महासचिव प्रभाकर जीवने, गजानन थूल, भय्यासाहेब शेलारे, करुणासागर पगारे, हर्षवर्धन सोनवने यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com