सिंचन विहीरींसाठी अनुदानच नाही, शेतकरी उसनवारीवर करतात बांधकाम

government not give money for irrigation well in sihora of bhandara
government not give money for irrigation well in sihora of bhandara

सिहोरा (जि. भंडारा ) : लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था डगमगली असल्याने अनेक लोकोपयोगी योजनांवर संक्रांत आली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या धडक सिंचन विहीर योजनेचे अनुदान रखडले आहे. यामुळे सिहोरा-बपेरा परिसरातील लाभार्थी शेतकरी अडचणीत आले आहेत. राज्य शासनाने उर्वरित अनुदान राशी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवीत आहे. या योजनांना जलदगतीने अनुदान राशी उपलब्ध करून देण्यात येत आहे. परंतु, मार्चअखेरपासून कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था सावरणारी तिजोरी खिळखिळी झाली आहे.

तुमसर तालुक्‍यात गत वर्षातील धडक सिंचन विहीर योजनेचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. सिहोरा-बपेरा परिसरात धडक सिंचन योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना विहीर मंजूर करण्यात आली आहे. 2019-2020 या सत्रात विहिरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. या शेतकरी लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला आहे. परंतु, नंतर उर्वरित हप्ते मिळाले नाहीत. शेतकऱ्यांनी उसनवारीवर साहित्याची खरेदी करून विहिरीचे बांधकाम केले आहे. परंतु, यात शेतकरी चांगलेच भरडले गेले आहेत. धानाच्या मळणीनंतर एकरी तीन ते चार पोती उत्पादन झाले असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्याचबरोबर परतीच्या पावसाने व मावा, तुडतुडा, करपा रोगाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत.

अनुदान त्वरित मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन -   
राज्य शासनाने धडक सिंचन विहिरीचे अनुदान तत्काळ देण्याची मागणी लाभार्थी शेतकरी करीत आहेत. या आशयाचे निवेदन भाजपचे नेते किशोर रहांगडाले, गोवर्धन शेंडे, अंबादास कानतोडे, चेतन रहांगडाले, देवानंद लांजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com