esakal | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर | Governor
sakal

बोलून बातमी शोधा

bhagat singh koshyari

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गडचिरोली जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यपाल कोश्यारी सोमवार (ता. ११) दुपारी गडचिरोलीत येणार आहेत. मंगळवार (ता. १२) सकाळी एमआयडीसी, गडचिरोली येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या मैदानावर सायकल रॅली काढली जाणार आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीचा प्रारंभ केला जाणार आहे. त्याच दिवशी सकाळी गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षान्त समारंभाच्या सोहळ्यास अध्यक्षस्थानी राज्यपाल कोश्यारी उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व राणी बंग यांच्या सर्च संस्थेच्या चातगाव येथील शोधग्रामास ते भेट देणार असल्याची माहिती सर्चच्या मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी दिली आहे.

हेही वाचा: अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मामाने केली भाच्याची हत्या

तसेच राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चव्हाणसुद्धा मंगळवारी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोलीमधील अधिकाऱ्यांसोबत त्यांची कार्यालय बैठक होणार आहे. याशिवाय राज्याचे नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी सायंकाळीच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

मंगळवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सायकल रॅलीच्या कार्यक्रमात त्यांचीही उपस्थिती राहणार आहे व गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षान्त समारंभालाही ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन एल.एम.ओ.प्लॅन्ट आणि पी.एस.ए.प्लॅन्टच्या उद्घाटन सोहळ्यास तसेच रुग्णवाहिका वाटप कार्यक्रमास त्यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे चार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

loading image
go to top