

Vidarbha News
esakal
कारंजा: तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीने आता निर्णायक टप्प्यात प्रवेश केला असल्याने गावागावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. १७ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने सरपंच पदासाठीच्या एक आणि सदस्य पदासाठीच्या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत चार सरपंच पदासाठी ९ तर ९ सदस्य पदासाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहे.