ग्रामपंचायत निवडणूक होतेय ग्लोबल; सोशल मीडियावर झळकताहेत अनेकांचे बॅनर अन्‌ पोस्टर

Gram Panchayat election are getting global in Wardha
Gram Panchayat election are getting global in Wardha

वर्धा : जिल्ह्यात 50 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. चिन्ह वाटपानंतर आता प्रचाराच्या तोफा सुरू झाल्या आहेत. यात अनेकांकडून सोशल मिडियाचा वापर होत आहे. या सोशल मीडियावर प्रचार सुरू झाल्याने आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही ग्लोबल झाल्याचे दिसत आले. राज्याच्या एका कोपऱ्यातील ग्रामपंचातीच्या उमेदवाराची माहिती दुसऱ्या कोपऱ्यातील गावात मिळत आहे. 

जिल्ह्यात 472 जागांसाठी 1 हजार 279 उमेदवार रिंगणात आहेत. त्या अनुषंगाने वॉर्ड, गाव बैठका घरोघरी व चौकाचौकात रणनितीसाठी इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू  आहेत. यात आता सोशल मीडियाचा वापर देखील उमेदवार करीत आहेत. .अनेक उमेदवार वेगवेगळ्या व्हिडिओ, ऑडिओ आणि बॅनर, पत्रके सोशल मीडियात व्हायरल करून आपला प्रचार करीत आहेत. यामुळे गावाच्या निवडणुका ग्लोबल होत आहेत. 

पैशाच्या नादी लागू नका, आता नाही तर पुन्हा नाही, आपला माणूस हक्‍काचा माणूस, इतिहास वाचायला नाही तर रचायला आलोय अशा वेगवेगळ्या घोषणांचा उपयोग करून इच्छुक उमेदवार प्रचार करीत आहेत. यंदा सोशल मीडियावर उमेदवारांचा दणदणीत प्रचार सुरू आहे. अशा प्रकारचे अनेक ऑडिओ व्हिडिओ व मिक्‍सिंग चित्रांची रेलचेल सोशल मीडियावर आहे.काहींनी तर भावी सरपंचाचे बिरूदही लावून प्रचार सुरू केला आहे. 

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची बांधणी सुरू  केली आहे.नामांकन दाखल केलेल्या उमेदवारांनी मात्र प्रचाराचा धडाका सोशल मीडियातून सुरू केला आहे. सोशल मिडियावर कधी न चमकणारे आता प्रचाराच्या माध्यमातून चमकत आहेत. तर काही उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन प्रचार तंत्र सुरू  केले आहे.

व्हॉटस्‌ ऍपवरही जनजागृती

तरुण वर्गाकडून विविध व्ह्‌ाटस्‌ऍप ग्रुपच्या माध्यमातून गावातील समस्या व सर्वागीण विकास आदी संदर्भात योग्य उमेदवार निवडीसाठी जनजागृती करण्यात येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com