esakal | अरेच्चा! यांनीही बांधले होते गुडघ्याला बाशिंग; मात्र बसला कोरोनाचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

sarpanch election in buldana.jpg

ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटले की, प्रचंड इर्षा, जोश, टोकाचा राजकीय संघर्ष आलाच.

अरेच्चा! यांनीही बांधले होते गुडघ्याला बाशिंग; मात्र बसला कोरोनाचा फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदुरा (जि.बुलडाणा) : निवडणूक आयोगाने कोरोना विषाणूंच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. त्या स्थितीत स्थगित ठेवण्याचा आदेश दिला आहे. तसेच आगामी जुलै ते डिसेंबर महिन्यात राज्यातील मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुका देखील पुढे जाण्याची दाट शक्‍यता असल्याने स्थानिक गटा-तटातील गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या राजकारणालाही कोरोनाचा फटका बसल्याचे निश्चित झाल्याने गावगाड्यातील नेत्यांचा या निवडणुका लांबणार म्हणून हिरमोड होणार आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटले की, प्रचंड इर्षा, जोश, टोकाचा राजकीय संघर्ष आलाच. त्यात प्रत्येक तालुक्‍यातील या निवडणुका तर कायमच अटीतटीच्या होतात. बुलडाणा जिल्ह्यातील जुलै ते डिसेंबर महिन्यात मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना, सदस्य आरक्षण आदी कामे प्रशासनाने सुरू केलेली होती. यातील बहुतांशी कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. त्यामुळे निवडणुका होणार म्हणून ग्रामीण भागातील कार्यकर्ते तयारीला लागलेले होते. 

महत्त्वाची बातमी - अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची ‘साठी’ पार

काही ठिकाणी तर या राजकारणाने वेग पकडण्यास सुरुवातही केली होती. तेवढ्यात जगभर हैदोस घातलेल्या कोरोनाने राज्यात शिरकाव करून खळबळ उडवून दिली. सध्या गावागावात केवळ कोरोनाचीच चर्चा चौकातील बैठकांचा मुख्य विषय झालेला आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका यापक्षा पेक्षा गटातटातच होतात. एखाद्या गावातील वेग वेगळ्या विचारांच्या गटांनी एकत्रितपणाने लढवलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा प्रभाव भविष्यातील विकास सोसायटी, सहकारी संस्था यांच्या बरोबर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या निवडणुका पर्यंत राहिल्याची उदाहरणे देखील आहेत.

हेही वाचा - माजी गृहराज्यमंत्र्यांची कन्या पुण्यात देतेय कोरोनाविरुद्ध लढा; फ्रंट लाईन वॉरियर म्हणून अविरत सेवा

काही गावात तर विकास सोसायटीच्या निवडणुका या ग्रामपंचायत निवडणुकीच्या महिनाभर आधिच होत असतात. यावरुन ग्रामपंचायतीच्या संभाव्य निकालाचे अंदाज बांधले जातात. आता सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्याने दोन्ही निवडणुकांची जुळणी करायची कशी? असा प्रश्न साहजिकच गावातील नेते मंडळींच्या पुढे असणार आहे. 

उमेदवाराची शोधा शोध झाली होती सुरू
काही महिन्यांवर आलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी ग्रामीण भागात सुरू झाली होती. वार्ड रचना होऊन सदस्यांचे आरक्षण देखील पडल्याने उमेदवार शोधण्यासाठी मोहीम उघडण्यात आली होती. मात्र, कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणूक आयोगाने आहे. त्या टप्प्यावर स्थगिती करण्याचे आदेश दिल्याने या उत्साही कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.