Gram Panchayat Elections Results: विहीरगावात नोटा ठरला निर्णायक; ईश्वरचिठ्ठीने निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन महिला उमेदवारांना समान मत आले. एक मत नोटावर गेले. मग काय एका बालकाच्या हाताने ईश्वरचिठठी काढण्यात आली आणि यामाध्यमातून निकाल देण्यात आला. याप्रकाराची संपुर्ण मतमोजणीच्या वेळेस रंजक चर्चा होती. 

दोन महिला उमेदवारांना समान मत आले. एक मत नोटावर गेले. मग काय एका बालकाच्या हाताने ईश्वरचिठठी काढण्यात आली आणि यामाध्यमातून निकाल देण्यात आला. याप्रकाराची संपुर्ण मतमोजणीच्या वेळेस रंजक चर्चा होती. 

Gram Panchayat Elections Results: विहीरगावात नोटा ठरला निर्णायक; ईश्वरचिठ्ठीने निकाल

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कोणाचा गेम होईल अनं कोण बाजी मारणार हे शेवटपर्यत स्पष्ट होत नाही. गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव ग्रामपंचपयातीत आज अशाच एका रंजक निकालाच्या घटनेची अनुभुती बघायला मिळाली.

दोन महिला उमेदवारांना समान मत आले. एक मत नोटावर गेले. मग काय एका बालकाच्या हाताने ईश्वरचिठठी काढण्यात आली आणि यामाध्यमातून निकाल देण्यात आला. याप्रकाराची संपुर्ण मतमोजणीच्या वेळेस रंजक चर्चा होती. 

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीतील 'बाहुबली'! ७३ वर्षीय हरिद्वार पुन्हा ठरले अजिंक्य; सलग दहाव्यांदा मारली बाजी 

गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगंावं ग्रामपंचायत येथील वार्ड क्र.3 मधील उमेदवारी अनु.जमाती महिलाकरिता आरक्षित होती. कल्पना मडावी व आशा मडावी या आमनेसामने होत्या. या वार्डाची निवडणुक अतिशय अटीतटीची झाली. पंधरा तारखेला निवडणुक पार पडले आणि  या वार्डात एकूण 117 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

आज सकाळी सकाळी दुसÚया फेरीत विहीरगावच्या मतमोजणीला सुरवात झाली आणि कल्पना मडावी अनं आशा मडावी या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 58 मत मिळाले. एक मत नोटावर होत. दोंघानाही समान मत मिळाल्याने तहसिलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी के.डी.मेश्राम यांनी चिठठीने निकाल देण्याचा निर्णय दिला. यावेळी एका बालकाच्या हस्ते चिठठी काढण्यात आली. यात आशा मडावी या भाग्यवान ठरल्या. 

नक्की वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

दरम्यान आशा मडावी अशा अनपेक्षित पध्दतीने निवडून आल्याने आता पराभूत पॅनलच्या आशा प्रचंड पल्लवीत झाल्या आहेत. त्याच्या विजयाने संरपंचपदासाठी आतापासूनच पराभूत पॅनलने सेटींगसाठी सुरवात केली आहे. आज मतमोजणी केंद्रावर घडलेल्या या प्रकाराची संपुर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top