esakal | ग्रामपंचायत निवडणुकीतील 'बाहुबली'! 73 वर्षीय हरिद्वार पुन्हा ठरले अजिंक्य; सलग दहाव्यांदा मारली बाजी 
sakal

बोलून बातमी शोधा

Man in Yavatmal district wins Gram Panchayat Elections tenth time

यवतमाळच्या सावरगड गावात 73 वर्षाचा योद्धा गावच्या सक्रिय राजकारणात आहेत. गेली 45 वर्ष सावरगड गावात ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच, उपसरपंच अशी विविध पदे भूषवत हरिद्वार चंद्रभान खडके हे तरुणांना लाजवेल असे काम करत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीतील 'बाहुबली'! 73 वर्षीय हरिद्वार पुन्हा ठरले अजिंक्य; सलग दहाव्यांदा मारली बाजी 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

यवतमाळ : 73 व्या वर्षी ग्राम पंचायत निवडणूक लढणाऱ्या एखाद्या व्यक्तींच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहते. इतके प्रेम करते की, तुम्हाला निवडणुकीत अपराजित ठेवते. असेच प्रेम तालुक्‍यातील सावरगड येथील हरिद्वार खडके यांना मिळाले आहे. आज त्यांचे वय 73 वर्षे आहे. गेल्या 1972 पासून त्यांनी 10 पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या आणि प्रत्येक निवडणुकीत ते अपराजित राहिलेत. तीच परंपरा कायम ठेवत त्यांनी या वर्षीच्या ग्रामपंचातीतही बाजी मारली आहे.

यवतमाळच्या सावरगड गावात 73 वर्षाचा योद्धा गावच्या सक्रिय राजकारणात आहेत. गेली 45 वर्ष सावरगड गावात ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच, उपसरपंच अशी विविध पदे भूषवत हरिद्वार चंद्रभान खडके हे तरुणांना लाजवेल असे काम करत आहेत. सरपंच, उपसरपंच, अशी पदे त्यांच्या वाटेला आलटून पालटून आली आहेत. यंदा वयाच्या 73 व्या वर्षीही त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. 

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

हरिद्वार खडकेंचा राजकीय प्रवास 

खडके यांनी 1972 मध्ये पहिली निवडणूक लढविली आणि जिंकून येत ते सत्ताधारी बनले. त्यांनतर गावाच्या राजकारणात त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. घाटंजी मार्गावरील सावरगड या छोट्याशा गावात नऊ ऑगस्ट 1948ला जन्म झाला. आईवडील मजुरी करायचे. त्यामुळे कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. परिणामी आठवीपर्यंतच ते शिक्षण घेऊ शकले. हरिद्वार खडके यांनी 1972मध्ये पहिल्यांदा यांना सावरगड ग्रामपंचायतीच्या आखाड्यात उतरविले.

पहिल्या प्रयत्नातच खडके हे विरोधकावर मात करीत मताधिक्‍याने निवडून आलेत. ते सावरगड ग्रामपंचायतीचे उपसरपंच झाले. त्यानंतर मात्र, खडके यांनी कधी मागे वळून बघितलेच नाही. गावाचा विकास साधत सावरगड ग्रामपंचायतीच्या प्रत्येक निवडणुकीत ते निवडून आलेत. 

अधिक वाचा - प्रेमासमोर जन्मदात्याचा विसर! 'प्लीज पप्पा, तक्रार नका देऊ न' असं म्हणत चाकूहल्ला करणाऱ्या मुलाची घेतली बाजू

त्यातूनच त्यांनी 1972 ते 2020 या कालावधीत तब्बल 20 वर्षे सरपंच, 15 वर्षे उपसरपंच आणि दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य अशी 45 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय कारकीर्द गाजविली. निवडणूक कोणतीही असो, विजयाची माळ खडके यांच्या गळ्यात पडली पाहिजे, असे समीकरण तयार झाले. पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला आहे. ग्रामपंचायतची कामे असो की, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय कुठेही खडके अगदी एखाद्या तरुणाप्रमाणे येतात. त्यामुळे ते  गावकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत म्हणूनच नागरिकांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवत त्यांना पुन्हा एकदा निवडून दिलं आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image