तालुक्यातील एकूण पन्नास ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एक अविरोध आल्याने एकूण ४९ ठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या. यात अनेक ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना धक्का देत जनतेने नव्याना संधी दिली. काही दिग्गजांना नवख्यांनी धूळ चारल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत
नेर (जि. यवतमाळ) : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यात अनेक राजकीय पक्षांची धूळधाण दिसत आहे तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हं दिसत आहेत.
जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार
तालुक्यातील एकूण पन्नास ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एक अविरोध आल्याने एकूण ४९ ठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या. यात अनेक ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना धक्का देत जनतेने नव्याना संधी दिली. काही दिग्गजांना नवख्यांनी धूळ चारल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत
तालुक्यातील शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज नाल्हे, काँग्रेसचे विनायक भेंडे यांनी आपला गढ राखला तर भाजपचे अनिल राठोड यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पाथ्रड येथील माजी सभापती मनीषा उमेश गोळे यांना पक्षातील नवख्यांनी धूळ चारत मात केली. तालुक्यातील चिकणी ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या ठिकाणी शिवसेनेचे दोन जिल्हा परिषद सदस्य आणि आर पी आय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष मोहन भोयर यांच्यात लढत होती.
नक्की वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली
यात निखिल जैत यांच्या पाच तर भोयर यांच्या चार उमेदवार निवडून आले. तालुक्यातील टाकळी सलामी येथील दिनेश चौधरी आणि रवींद्र कास्टे यांना प्रत्येकी १६९ मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात रवींद्र कास्टे विजयी झाले. निवडून आलेल्या अनेकांच्या भावना अनावर झाल्या. अनेक गावात सत्तांतर पहावयास मिळाले.
संपादन - अथर्व महांकाळ