esakal | थंडीत ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान; पॅनेल सेटिंगचे ‘गेम’
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat elections in rural areas

धामणगावरेल्वे तालुक्‍यात सर्वाधिक ५५ ग्रामपंचायती आहेत. विशेष म्हणजे आतापासून पॅनेल सेटिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आपल्याला पॅनेलमध्ये स्थान मिळविण्यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत.

थंडीत ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान; पॅनेल सेटिंगचे ‘गेम’

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान सुरू झाले आहे. जिल्ह्यातील धामणगावरेल्वे तालुक्‍यात सर्वाधिक ५५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. यामुळे तालुक्‍यातील राजकीय वातावरण सर्वाधिक तापले आहे. तर तिवसा तालुक्‍यात सर्वांत कमी म्हणजेच २९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.

अवघ्या दहा दिवसांवर नामांकन अर्ज दाखल करण्याचा अवधी असल्याने गावपुढारी व कार्यकर्त्यांमधील लगबग चांगलीच वाढली आहे. २३ डिसेंबरपासून नामांकनाला सुरुवात होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार असून, धामणगावरेल्वे तालुक्‍यात सर्वाधिक ५५ ग्रामपंचायती आहेत. विशेष म्हणजे आतापासून पॅनेल सेटिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आपल्याला पॅनेलमध्ये स्थान मिळविण्यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत.

अधिक वाचा - ‘सेक्‍स रॅकेट’च्या साखळीत अडकला दुकानदार; धमकी देत मागितली दहा लाखांची खंडणी

आता नामांकन सुरू होण्यासाठी दहा दिवस उरले आहे. ग्रामपंचायतस्तरावर स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी सक्षम पॅनेलच्या निर्मितीवर बहुतांश नेतेमंडळींचा जोर आहे. मागील वेळी केलेल्या चुका या वेळी करायच्या नाहीत, अशी खूणगाठ मनाशी बांधून नव्यांना संधी देण्याचे धोरण बहुतांश ठिकाणी राबविले जाणार असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे.

अशी आहे ग्रामपंचायतची संख्या

 • अमरावती ४६
 • भातकुली ३६
 • तिवसा २९
 • दर्यापूर ५०
 • मोर्शी ३९
 • वरुड ४१
 • अंजनगावसुर्जी ३४
 • अचलपूर ४४
 • धारणी ३५
 • चिखलदरा २३
 • नांदगाव ५१
 • चांदूररेल्वे २९
 • चांदूरबाजार ४१
 • धामणगावरेल्वे ५५

संपादन - नीलेश डाखोरे

loading image