दारू पकडून दिली म्हणून ग्रामपंचायत सदस्यास मारहाण

file photo
file photo

टाकरखेडासंभू (जि. अमरावती) :  दोन दिवसांपूर्वी दारू पकडून दिली म्हणून अवैध दारूविक्री करणाऱ्या पाच जणांनी ग्रामपंचायत सदस्यास मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. 26) सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान देवरा फाटा येथे घडली. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. योगेश विनोदराव भेटाळू, असे जखमी लसनापूर ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. 24 ऑगस्ट रोजी एका चारचाकी वाहनात अवैधरीत्या दारू घेऊन जाणाऱ्याला साऊर येथे ग्रामस्थांनी चोपले. त्याचा वचपा काढण्यासाठी सोमवारी (ता. 26) देवरा फाट्यावर गणेश झाकर्डे, मयूर बुके, विनोद बोरकर, प्रशांत वाकोडे, अजय गुगलमाने यांनी ग्रामपंचायत सदस्य योगेश भेटाळू यांना पकडून बेदम मारहाण केली. जखमी भेटाळू यांनी वलगाव पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com