सहा दिवसांनंतर उघडली ग्रामपंचायत

नागपूर : ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा करताना राजेंद्र भुयार.
नागपूर : ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा करताना राजेंद्र भुयार.

कुही (जि. नागपूर) :  सरपंच व सचिवाच्या कारभाराला कंटाळून मांढळ ग्रामपंचातीला सदस्यांनी कुलूप लावले होते. आज तब्बल सहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हे कुलूप काढण्यात आले. कुही तालुक्‍याचे आर्थिक केंद्र असलेल्या मांढळकडे तालुका प्रशासनाचे लक्ष जाण्यासाठी तब्बल सहा दिवसांचा कालावधी लागला, यावर आता आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाचे तालुक्‍याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
सरपंच शाहू कुलसंगे व ग्रामपंचायतीचे सचिव यांनी 29 जून रोजी मासिक सभा बोलावली होती. मात्र, सरपंच व सचिव वेळेवर हजर झाले नाहीत. बरीच वाट पाहून सदस्यांनी अखेर ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. ही माहिती मिळाल्यानंतर कुही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आत्राम यांनी मांढळ ग्रामपंचायतला भेट दिली. मात्र स्थानिक परिस्थिती पाहता त्यांना आल्या पावली परत जावे लागले होते. या घटनेची दखल घेत नागपूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोयर यांनी गुरुवारी मांढळ ग्रामपंचायतला भेट दिली. ग्रामपचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या समक्ष ग्रामपंचायत सदस्यांनी कुलूप उघडले. कुही पंचायत समितीचे उपसभापती संजय वाघमारे, गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडकम, पंचायत समिती सदस्य हरीश कढव, ग्रामपंचायत सदस्य राजेश तिवस्कर, धनपाल लोहारे, संजय निरगुळकर, प्रदीप कुलरकर, मोना बुढ्ढे, शांता शेंडे, गंगू दुपारे, संगीता निरगुळकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com