ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुन्हा लांबणार? इच्छुकांना करावी लागणार प्रतिक्षा

grampanchayat election may be postponed again if corona cases increases in amravati
grampanchayat election may be postponed again if corona cases increases in amravati

अमरावती : कोरोना संक्रमणामुळे रखडलेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकांचे पडघम पुढील वर्षी फेब्रुवारीत वाजण्याचे संकेत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने नियोजनास सुरुवात केल्याची माहिती आहे. अमरावती जिल्ह्यातील 526 ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. मात्र, या निवडणुकांचे भवितव्य कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेवर अवलंबून आहे. रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा त्या रखडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

मार्च व एप्रिल महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 526 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तयारी झाली होती. इच्छुकांकडून नामनिदेर्शन दाखल करण्यात आले होते. दरम्यान, 24 मार्चला शासनाने कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमिवर लॉकडाउन लागू केले व निवडणुका अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. शासनाने मुदत संपलेल्या ग्राम पंचायतींचे सदस्य मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासकाची नियुक्ती केली. प्रशासकांच्या नियुक्तीचाही वाद या कालावधीत बराच रंगला.

अनलॉकमध्ये दिवाळीपूर्वी संक्रमणाची स्थिती नियंत्रणात वाटू लागली. त्यामुळे रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले. 25 सप्टेंबरला तयार झालेली मतदारयादी मतदानासाठी ग्राह्य मानण्यात येणार असून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 1 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर हरकती व सूचना आल्यानंतर सुधारित व अंतिम मतदार यादी 10 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अमरावती जिल्ह्यात 526 ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रस्तावित असून 1972 प्रभाग आहेत. 5 हजार 319 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. 14 लाख 43 हजार 363 मतदार जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या यादीत आहेत. त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्‍यता आहे.

निवडणूक आयोगाने निवडणुकांचे संकेत दिल्याने ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांची लगबग पुन्हा एकदा सुरू होणार आहे. अतिशय अटीतटीच्या होणाऱ्या या निवडणुकांचे भवितव्य मात्र कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेवर अवलंबून आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com