सामाजिक सभागृहाला दिले माजी मुख्यमंत्र्यांचे नाव, पण ग्रामपंचायतीने कापले; गावात तणाव

अविनाश वाळके
Thursday, 28 January 2021

पोंभुर्णा तालुक्‍यातील बोर्डा बोरकर ग्रामपंचायतीअंतर्गत बोर्डा दिक्षित या गावात सभागृहाचे बांधकाम करण्यात आले. या सभागृहाला ग्रामपंचायतच्या मासिक सभेत दीवंगत मा.सा. कन्नमवार हे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

पोंभुर्णा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूरचे सुपूत्र आणि माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचे नाव बोर्डा दीक्षित येथील सामाजिक सभागृहाला देण्यात आले. मात्र, ग्रामपंचायतीने या सभागृहावरील नाव कापले. यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. मोठा पोलिस फौज फाटा तैनात केल्यानंतर जमावाला शांत करण्यात आले. 

हेही वाचा - युट्यूब बघितले अन् सूचली भन्नाट आयडिया, घरीच फक्त १५ रुपयांत तयार करतोय गावरानी कोंबडीचे पिल्लू

पोंभुर्णा तालुक्‍यातील बोर्डा बोरकर ग्रामपंचायतीअंतर्गत बोर्डा दिक्षित या गावात सभागृहाचे बांधकाम करण्यात आले. या सभागृहाला ग्रामपंचायतच्या मासिक सभेत दीवंगत मा.सा. कन्नमवार हे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे सभागृहाला माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवारांचे नाव देण्याचा आले. परंतु, गावातील काही लोकांनी यावर आक्षेप घेतला आणि ग्रामपंचायतीला हाताशी धरुन लिहिलेले नाव रंग मारून मिटविण्यात आले. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. युवा विदर्भ बेलदार समाज संघटनेचे अध्यक्ष संजय कुरेवार, उपाध्यक्ष केशव गेलकिवार, सचिव निलेश महाजनवार यांनी संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे. सध्या गावातील तणाव बघता पोलिस तैनात करण्यात आले आहे. 

हेही वाचा - खोल पाण्याकडे पाहत घुटमळत होती तरुणी, काही क्षणातच घडलेल्या प्रसंगाने उपस्थितही चक्रावले

ग्रामपंचायतीचे स्पष्टीकरण -
सामाजिक सभागृहाला दीवंगत माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांचे नाव देण्याचा ठराव ग्रामपंचायने एका वर्षापूर्वी घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाला तो ठराव पाठविण्यात आला. परंतु, संबंधित विभागाकडून या ठरावाच्या अनुषंगाने कोणतेही पत्र अथवा सूचना आल्या नाही. दुसरीकडे केशव मेलकीवार यांनी ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता स्वखर्चाने सभागृहाला नाव दिले. त्यामुळे दोन गटात वाद निर्माण झाला. शेवटी वाद पोलिस ठाण्यात पोहोचला. दोन्ही गटाच्या सहमतीने सामाजिक सभागृह बोर्डा, असे नाव देण्यात आल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grampanchayt cut the name of former cm kannamwar on social hall in pombhurna of chandrapur