ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

सावनेर (जि.नागपूर) :  ग्रामसेवकांच्या काही प्रलंबित मागण्या शासनातर्फे आश्वासन देऊनही अमलात आल्या नाहीत. यामुळे राज्य ग्रामसेवक कर्मचारी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतल्याने तालुक्‍यातील 75 ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या 118 गावांसाठी कार्यरत 42 ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी 22 जुलैपासून संपावर आहेत. त्यांच्या या आंदोलनाची झळ तालुक्‍यात 118 गावांना सहन करावी लागत आहे.

ग्रामपंचायतीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुणी नसल्याने काही गावातील सरपंचही निर्माण होणाऱ्या समस्येला चालढकल करीत असल्याचे गावकरी सांगतात. अनेक गावांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने आजाराचे प्रमाणही वाढत आहे. यातच ग्रामपंचायतमध्ये कार्यरत कंत्राटी संगणक ऑपरेटर कर्मचाऱ्यांनीही संपाचे हत्यार वापरल्याने गावकऱ्यांची व ग्रामपंचायतची संगणकीय कामे बंद आहेत. गावकरी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर रोष व्यक्त केला जात आहे. ग्रामसेवकांचा हा संप लवकर मिटावा, कामे पूर्ववत सुरू व्हावीत म्हणून गावकरी प्रतीक्षेत आहेत.
बुधवारी महसूल विभागाचे कामकाज ठप्प
महसूल विभागाने बुधवारला एक दिवस सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेऊन संपूर्ण दिवस कामकाज बंद आंदोलन केल्याने शेकडो लोकांना तहसील कार्यालयात येऊन परत जावे लागले. त्यामुळे आता गावकरी चिंतेत आहेत. एकीकडे ग्रामसेवकांचा संप दुसरीकडे कंत्राटी संगणक ऑपरेटरचा संप यातच महसूल विभागाने घेतलेली एकदिवसीय संपातील उडी यामुळे गावकऱ्यांची कामे खोळंबली आहेत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gramsevak's agitation hit the general public