शेकोटीजवळ हात शेकत बसणे आजोबांना पडले महाग; अचानक घडले असे... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

नागपूर शहरातील महाल भागात संघ बिल्डिंगच्या बाजूला राहणारे अनंतराव वाटक हे 80 वर्षीय वृद्ध आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रात्री जेवण केले. त्यानंतर अंगणात शेकोटी पेटवून सर्वजण शेकोटोभोवती हात शेकत बसले.

नागपूर : रात्री अंगणात शेकोटीजवळ हात शेकत बसलेल्या वृद्धाच्या धोतराने अचानक पेट घेतला आणि गंभीर जळालेल्या वृद्धाचा दहा दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला. ही घटना नागपूर शहरातील महाल भागात नुकतीच घडली. 

फेब्रुवारी संपत आला आहे. त्यामुळे हिवाळ्यातील थंडीचे प्रमाण कमी होत हळूहळू ऊन तापायला लागले आहे. तरी पण रात्री वातावरणात बऱ्यापैकी थंडावा असतो. 10 फेब्रुवारीचा ती रात्र. वातावरणात चांगलाच थंडावा होता. नागपूर शहरातील महाल भागात संघ बिल्डिंगच्या बाजूला राहणारे अनंतराव वाटक हे 80 वर्षीय वृद्ध आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रात्री जेवण केले. त्यानंतर अंगणात शेकोटी पेटवून सर्वजण शेकोटोभोवती हात शेकत बसले. काही वेळाने वृद्ध अनंतराव वगळता घरात निघून गेले. मात्र, अनंतराव शेकोटीजवळ एकटेच बसले होते.

अवश्‍य वाचा- अन्‌ त्यांचा अखेरचा प्रवासही सोबतच झाला... ​

अचानक धोतराने घेतला पेट

अनंतरावांनी धोतर नेसले होते. शेकोटीजवळ हात शेकत असताना आग त्यांच्या धोतरापर्यंत कधी पोहोचली त्यांना कळले देखील नाही. काहीही ध्यानीमनी नसताना अचानक अनंतरावच्या धोतराने पेट घेतला. पाहता-पाहता अनंतरावांच्या अंगातील सर्व कपड्यांनीसुद्धा पेट घेतला. यामध्ये अनंतराव गंभीररित्या भाजले गेले. घरात गेलेल्या कुटुंबियांना काही वेळाने या घटनेची कल्पना आली. त्यांनी तत्काळ वृद्ध अनंतराव यांना खासगी रुग्णालयात भरती केले. तब्बल दहा दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, अखेर मृत्यूपुढे त्यांना झुकावे लागले. गुरुवारी, 20 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोतवाली पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandfather was seated near the fire and accidentaly It happened ...

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: