अथर्व बागडेने तयार केली ‘ग्रीन कार’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

डॉ. आंबेडकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निर्मिती  

नागपूर - अभियांत्रिकी क्षेत्रात प्रदूषणमुक्त ऊर्जेवर चालणाऱ्या साधनांची निर्मिती  करण्याच्या दृष्टीने अनेक संशोधन आणि साधनांची निर्मिती होत आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात त्या दृष्टीने विविध यशस्वी प्रयोग केले गेलेत. त्यात आणखी भर पडली, ती डॉ. बाबासाहेब  आंबेडकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील अथर्व बागडे व त्याच्या चमूने तयार केलेल्या ग्रीन कारची. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय स्पर्धेत त्याने चौथा क्रमांक पटकावला.

इंदोर येथील पितमपूर येथे ई-बाहा २०१७ या अखिल भारतीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी देशभरातील महाविद्यालयांसाठी ई-कार निर्मिती अशी स्पर्धा घेण्यात आली होती.  त्यात आंबेडकर महाविद्यालयाच्या चमूने पहिल्या टप्प्यात ई-कारचे मॉडेल सादर केले. ४०८ महाविद्यालयातून आंबेडकर महाविद्यालयाचे मॉडेल निवडण्यात आले. मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍टॉनिक्‍सच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ई-व्हेईकल तयार केली.  

ग्रीन कार तयार करण्यासाठी ‘रेवा ई२ओ’चे मॉडेल वापरले. डिझायनिंग, रचना, जोडणी करीत विद्यार्थ्यांनी कारची निर्मिती केली. व्हेईकल टेस्टिंग ट्रॅकवर देशभरातील १८५ चमूच्या मॉडेलसोबत स्पर्धा करीत डॉ. आंबेडकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत चौथे स्थान पटकाविले. शिवाय त्याची किंमत, निर्मिती, योग्यता, इको फ्रेंडलीनेस, गाडीचे डिझाईन  अशा निकषांवर पूर्ण ठरत देशातून पाचवा क्रमांक पटकावला. ही गाडी तयार करण्यासाठी साडेचार लाखांचा खर्च आला. मात्र, मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यास खर्च कमी होऊ शकतो. अशा प्रकारच्या बॅटरीवर चालणाऱ्या चार सीटर ई-कारची निर्मिती करता येईल. आताचे डिझाईनचे पेटेंटही फाईल आणि ई-व्हेईकल्सची निर्मिती करण्यात येऊ शकेल, अशा विश्‍वास प्रा. काळे यांनी व्यक्त केला.

२५ सदस्यांची चमू
महाविद्यालयाच्या २५ सदस्यीय चमूचे नेतृत्व अथर्व बागडेने केले. त्यात ऋत्विक सावरकर, साहिल पटवर्धन होता. विद्यार्थ्यांना प्रा. भोजराज काळे, प्रा. एस. व्ही. लुताडे, प्रा. पांडे यांचे मार्गदर्शन लाभले. या गाडीच्या निर्मितीसाठी मेघे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, वेडवेल इलेक्‍ट्रोड्‌स आणि एमआयएने सहकार्य केले.

Web Title: green car make to green car