चोरी टाळण्यासाठी पोलिस घरोघरी पोहोचवित आहेत मार्गदर्शन सूचना

मंगेश बेले
Monday, 28 December 2020

घरफोडी टाळण्यासाठी आपल्या मौल्यवान वस्तू, पैसे बॅंकेत ठेवावे. बाहेरगावी जाण्यापूर्वी विश्‍वासातील शेजाऱ्यांना माहिती द्यावी. शिवाय गरज पडल्यास पोलिस ठाण्याला सुद्धा कळवावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी बल्लारपूरवासींना केले आहे.

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : गत काही दिवसांपासून शहरात घरफोडी, वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आता पोलिसांनी या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नागरिकांनाच खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शहरवासींसाठी पोलिसांनी एक लिखित मार्गदर्शक सूचना तयार केली आहे. ती आता शहरातील घराघरांत पोचविली जात आहे. 

यावर्षी बल्लारपूर शहरात गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, या घटना घडूच नये याकरिता नागरिकांचे सहकार्य आवश्‍यक आहे, ही बाब लक्षात घेऊन नागरिकांपर्यंत पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना पोचविल्या जात आहेत.

 

खुशखबर! गडचिरोलीतील गर्भवती महिलांची पायपीट थांबणार, आता तालुक्यातच मिळणार सुविधा  
 

घरफोडी टाळण्यासाठी आपल्या मौल्यवान वस्तू, पैसे बॅंकेत ठेवावे. बाहेरगावी जाण्यापूर्वी विश्‍वासातील शेजाऱ्यांना माहिती द्यावी. शिवाय गरज पडल्यास पोलिस ठाण्याला सुद्धा कळवावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी बल्लारपूरवासींना केले आहे. महिलांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे, हे या मार्गदर्शक सूचनांमध्ये आहेत. त्यामुळे पोलिस विभागाकडून देण्यात आलेल्या या सूचना दिली. 

खुशखबर! आता घर आणि दुकानांनाही मिळणार स्टार रेटिंग; करात मिळणार सुट; राज्यात पहिलाच प्रयोग

 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना बराच कालावधी घरीच काढावा लागला. आता हा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यामुळे शहरातील नागरिक लग्न समारंभ आणि इतर कामासाठी बाहेरगावी जात आहेत. याच संधीचा चोरटे लाभ उचलत आहेत. नागरिकांच्या रक्षणार्थ पोलिस तत्पर आहेत. 
- उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बल्लारपूर.

चोरीच्या घटना घडू नये यासाठी पोलिस विभागाकडून घरोघरी पोचविण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना नागरिकांच्या हिताच्या आहेत. याबद्दल पोलिस विभागाचे विशेष आभार.
- संजय कोपरकर, व्यावसायिक.

 

संपादन ः राजेंद्र मारोटकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guidlines are being delivered house to house by the police to prevent theft