esakal | फॅशन हैं तो हैं : देशी कट्टा बाळगण्याची वाढली क्रेझ
sakal

बोलून बातमी शोधा

फॅशन हैं तो हैं : देशी कट्टा बाळगण्याची वाढली क्रेझ

फॅशन हैं तो हैं : देशी कट्टा बाळगण्याची वाढली क्रेझ

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : काही वर्षांत कमरेला पिस्तूल बांधून फिरण्याचे प्रकार चांगलेच वाढले आहे. राजकारणी, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यावसायिक आदी मंडळींनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून पिस्तूल बाळगण्याचे परवाने मिळविले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे अवैधरीत्या देशीकट्टा खरेदी करून बाळगण्याची क्रेझ धोकादायक वळणावर आली आहे. (Gun-Fashion-Symbol-Desi-Katta-Yavatmal-District-News-nad86)

यवतमाळ शहर गुन्हेगारीसाठी राज्यात कुप्रसिद्ध आहे. येथील प्रमुख टोळीतील संघर्ष शांत असल्याचे दिसत असले तरी अधूनमधून कोणत्या ना कोणत्या कारणातून वाद उखरून काढला जातो. गेल्या महिन्यात वाळू व्यवसायात वर्चस्व निर्माण करण्याच्या वादातून करण परोपटे याचा खून करण्यात आला. या प्रकरणाचा मास्टरमाइंड पोलिस दप्तरी कुख्यात म्हणून नोंद असलेला अक्षय राठोड आहे. या प्रकरणात देशी कट्ट्याचा वापर करण्यात आला होता.

हेही वाचा: मनपा शाळेत प्रवेशासाठी गर्दी; चंद्रपुरातील शाळेत दिल्ली पॅटर्न

या घटनेची शाई वाळत नाही तोच, अवधूतवाडी पोलिसांनी गोधणी बायपासवर दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले होते. बाभूळगाव तालुक्यातील दोघांना देशी कट्टा बाळगून असताना अवधूतवाडी पोलिसांनीच जेरबंद केले. गुन्हेगारी रेकॉर्ड असणारे व नसणारेही देशी कट्टा बाळगत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रतिष्ठित व्यक्तींनी जिवाला धोका असल्याचे कागदोपत्री दाखवून प्रशासनाकडून परवाना मिळविला. मात्र, पाच वर्षांत परवाना देताना गृह विभागाकडून चांगलीच खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे परवाना न मिळविता अवैधरीत्या देशीकट्टा बाळगण्याची क्रेझ चांगलीच वाढत आहे. देशीकट्ट्याच्या जोरावर गुन्हेगारी वर्तुळातील तरुण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

काही हजारच मोजावे लागतात

देशीकट्टा विकत घेण्यासाठी अवघे काही हजार रुपये मोजावे लागते. मध्यप्रदेशातून ते सहज उपलब्ध होतात. त्याचे प्रशिक्षणही विक्रेत्यांकडून जंगली भागात दिले जाते. तीन वर्षांपूर्वी टोळीविरोधी पथकाने देशी कट्टा संदर्भात धडाकेबाज कारवाई करून अनेकांची झोप उडवून दिली होती.

(Gun-Fashion-Symbol-Desi-Katta-Yavatmal-District-News-nad86)

loading image