

Gunj News Minor Girl Case Triggers Tension as Angry Mob Assaults 42 Year Old Man and Surrounds Police Vehicle in the Village
esakal
महागाव : अल्पवयीन विद्यार्थीनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी अक्षेपार्ह वर्तन करण्यात आल्याच्या घटनेने गुंज गावात आज गुरुवारी अक्षरशः तणावाचा भडका उडाला. शाळेच्या मागील शेतात संबंधित इसम आणि अल्पवयीन मुलगी आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याची माहिती पसरताच संतप्त नागरिकांचा जमाव घटनास्थळी जमा झाला. अकबर आझाद पठाण (वय ४२, रा. गुंज) याला जमावाने पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर उतरला. गुंज बस स्थानक परिसरात प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली. वाहतूक आडविण्यात आल्याने प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.