उच्च न्यायालयात आढळल्या बंदुका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

नागपूर : उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये अनेक नागरिकांजवळ बंदुका आढळून आल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनतर्फे उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये बंदुका न आणण्यासंदर्भात सूचना जाहीर करण्यात आली आहे. बंदुकीसह उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये प्रवेश करणारे नागरिक मुख्य प्रवेशद्वाराऐवजी खाद्यगृहाजवळील क्रमांक दोनच्या प्रवेशद्वारामधून आत प्रवेश करतात. त्यामुळे, अशा व्यक्तींची नोंद प्रवेशद्वारावर असलेल्या नोंद वहीमध्ये होत नाही. तर, सीसीटीव्ही फुटेजमध्येसुद्धा त्यांची दखल घेतली जात नाही.

नागपूर : उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये अनेक नागरिकांजवळ बंदुका आढळून आल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनतर्फे उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये बंदुका न आणण्यासंदर्भात सूचना जाहीर करण्यात आली आहे. बंदुकीसह उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये प्रवेश करणारे नागरिक मुख्य प्रवेशद्वाराऐवजी खाद्यगृहाजवळील क्रमांक दोनच्या प्रवेशद्वारामधून आत प्रवेश करतात. त्यामुळे, अशा व्यक्तींची नोंद प्रवेशद्वारावर असलेल्या नोंद वहीमध्ये होत नाही. तर, सीसीटीव्ही फुटेजमध्येसुद्धा त्यांची दखल घेतली जात नाही. असोसिएशनचे सदस्य नसलेल्या व्यक्तींनी सदस्य वकिलांसोबत क्रमांक दोनच्या प्रवेशद्वारातून आत येऊ नये, अशी सूचना यामध्ये करण्यात आली आहे. तसेच, आपल्या पक्षकारांना क्रमांक दोनच्या प्रवेशद्वारातून न आणता मुख्य प्रवेशद्वारातूनच आत घेऊन यावे, अशी सूचना उच्च न्यायालयाचे सदस्य असलेल्या वकिलांनासुद्धा देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: guns found in the High Court