
प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’
सामाजिक क्रांतीचे प्रणेते व संतशिरोमणी गुरू रविदास यांचा जन्म फेब्रुवारी महिन्यात माघ पौर्णिमेच्या दिवशी उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात काशीजवळ गोवर्धनपूर येथे चर्मकार कुटुंबात झाला. जन्माचा दिवस रविवार असल्याने त्यांचे नाव रविदास ठेवण्यात आले. गुरू रविदास समाजसुधारक, विचारवंत, तत्त्ववेत्ता व उत्कृष्ट कवी होते. आधुनिकतेचा ध्यास असलेला हा संत.