अर्धा डझन रेल्वेगाड्या विलंबाने

file photo
file photo

नागपूर  : देशाच्या वेगवेगळ्या भागात रेल्वेरुळांच्या सक्षमीकरणासह रेल्वेशी संबंधित वेगवेगळी विकासकामे सुरू आहेत. त्याचा परिणाम रेल्वेच्या गतीवर झाला आहे. मंगळवरी नागपूरमार्गे धावणाऱ्या अर्धा डझनहून अधिक गाड्या नियोजित वेळेपेक्षा तासन्‌तास उशिरा धावत होत्या.
रेल्वेगाड्यांमधील गर्दी लक्षात घेऊन मंगळवारी नागपूरहून डेब्रुगढसाठी स्पेशल ट्रेन सोडण्यात आली. नियोजित वेळेनुसार ही गाडी मंगळवारी सकाळी 10.30 वाजता रवाना होणार होती. प्रत्यक्षात तब्बल12 तासाहूनही अधिक विलंबाने रात्री 11 वाजता रवाना झाली. प्रवासी सुविधेचा गाजावाजा करीत या गाडीचे नियोजन करण्यात आले. परंतु, ही सुविधाच खऱ्या अर्थाने प्रवाशांचीच परीक्षा घेणारी ठरली.
मंगळवारी एकूण सात गाड्या उशिरा धावत असल्याची नोंद झाली. यात प्रामुख्याने दक्षिणेकडून येणाऱ्या गाड्यांचा समावेश होता. 12592 यशवंतपूर - गोरखपूर एक्‍स्प्रेस सर्वाधिक 12 तास, त्यापाठोपाठ 22691 बेंगळूरू - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्‍स्प्रेस 5.30 तास, 22683 यशवंतपूर - लखनऊ एक्‍स्प्रेस 5.30 तास, 12644 हजरत निजामुद्दीन - त्रिवेंद्रम स्वर्ण जयंती एक्‍स्प्रेस 4.30 तास, 12670छपरा - चेन्नई गंगाकावेरी एक्‍स्प्रेस 3.30 तास, 11046 धानाबाद - मुंबई दीक्षाभूमी एक्‍स्प्रेस दीड तास आणि 12859 मुंबई - हावडा गीतांजली एक्‍स्प्रेस 1 तास उशिरा धावत होती. रेल्वे गाड्यांच्या लेटलतिफीमुळे प्रवाशांना गैरसोयिंचा सामना करावा लागला होता. उशिरा येणाऱ्या गाड्यांची माहिती प्रवाशांना देण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर विशेष हेल्पडेक्‍स लावण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com