दिव्यांगांनी घेतला ताडोबातील निसर्गाचा आनंद

file photo
file photo

चंद्रपूर : ताडोबातील विविध प्राणी, पक्षी बघून निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा, या दृष्टिकोनातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांना ताडोबाची सफर घडविण्याचे आश्‍वासन दिले होते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, जिल्ह्याच्या वन विभागाने पालकमंत्र्यांच्या घोषणेला प्रत्यक्ष मूर्तरूप दिले आहे. समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी दिव्यांगांच्या ताडोबा सफारीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपुरात दिव्यांगांसाठी मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्याच्या मोफत सफारीचा आनंद दिव्यांगांना देण्याची घोषणा केली होती. यापूर्वी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना अशा मोफत ताडोबा सफारीचा उपक्रम पालकमंत्र्यांनी राबविला आहे. ताडोबामध्ये जगभरातून व्याघ्र दर्शनासाठी तसेच पर्यावरण अभ्यासासाठी पर्यटक मोठ्या उत्सुकतेने येत असतात. येथील जैवविविधता तसेच नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेऊन आनंदाने मायदेशी परत जातात. अशा आनंदापासून स्वतःच्या जिल्ह्यातील दिव्यांग बांधव वंचित राहू नये, त्यांनाही मातृभूमीचे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळता यावे, जगप्रसिद्ध वाघाचे दर्शन घेता यावे, विविध प्राणी पक्षी व अनोखी जैवविविधता स्वतःच्या डोळ्याने बघता यावी, हाच त्यामागचा उद्देश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com