द्वेष हवा की सद्‌भाव - ऊर्मिला मातोंडकर

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर: देशातील राजकीय वातावरण नकारात्मकतेने भरले आहे. देश कसा असावा द्वेषाने भरलेला की सकारात्मकता, सद्‌भाव असणारा, असा भावनिक प्रश्‍न अभिनेत्री आणि कॉंग्रेसनेत्या ऊर्मिला मातोंडकर यांनी आज येथे उपस्थित केला.
कॉंग्रेस पक्षाच्या वाटचालीवर आधारित "आजादी से आजादी की और' नाटक गुरुवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सादर करण्यात आले. ऊर्मिला मातोंडकरने नाटकानंतर आपल्या भावना मांडल्या. देशाच्या धमन्यांमध्ये कॉंग्रेसी रक्तच वाहत आहे. देशाला तंत्रज्ञान देणाऱ्या कॉंग्रेसच्या विचारधारेवरच विरोधक व्हॉट्‌सऍपसह अन्य माध्यमांच्या मदतीने प्रहार करीत आहेत. 11 वर्षे तुरुंगवास भोगून देशाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंविषयी आज व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून खोटी माहिती पसरविली जात आहे. रांगेत उभा राहून ओरडणारा एखादवेळ लक्ष वेधून घेऊन शकतो. पण, प्रत्येकाचे ओरडणे सत्य नसते. चकाकणारी प्रत्येक पिवळी वस्तू सोने नसते. यामुळे लोकांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. भारत आणि पाक हे दोन देश एकाचवेळी स्वतंत्र झाले. त्यातील केवळ भारतच महासत्ता होण्याच्या वाटेवर अग्रेसर आहे. मनातील गोष्टी लोकांना सांगायच्या होत्या. देशासाठी काही करायचे होते, त्यासाठीच राजकारणात आले. अभिनेत्री म्हणून तुम्ही प्रेम, आशीर्वाद दिला. या प्रवासातही साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रेक्षक दोन तास वेठीस
आयोजकांनी दिलेल्या वेळेनुसार कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकही दुपारी 4 वाजतापासून सभागृहात पोहचू लागले. परंतु, नाटक नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिरा सुरू झाले. विलंबासाठी सभागृह उशिरा मिळाल्याचे कारण देण्यात आले. तब्बल दोन तास वेठीस धरल्याची नाराजी प्रेक्षकांनी व्यक्त केली.
हाणामारी
कार्यक्रमाला बराच उशीर असल्याचे लक्षात येताच सभागृहात आलेले प्रेक्षक बाहेर पडू लागले. अशातच दोघांमध्ये बाचाबाची अन्‌ हाणामारीही झाली. त्यातील एक कॉंग्रेस कार्यकर्ता होता. पण, दुसरा कोण ते कळू शकले नाही. व्यावसायिक वादातून त्यांच्यात जुंपल्याची चर्चा परिसरात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com