esakal | महिलेचे अपहरण करून त्याने लावून दिले होते लग्न; आता खातोय तुरुंगाची हवा 
sakal

बोलून बातमी शोधा

jail

या प्रकरणात जी पीडित महिला आहे, तिचीही तपास अधिकाऱ्यांनी भेट घेतली. तिचा पती बंगलोर (कर्नाटक) येथे राहतो. तिला बयाण देण्यासाठी अमरावती पोलिसांपुढे हजर राहण्यास सांगितले होते. तिने येण्यासाठी होकार दिला होता. ती स्वत:हून राजस्थानात गेली आणि लग्न केले, असे तिने पोलिसांना भेटीअंती सांगितले.

महिलेचे अपहरण करून त्याने लावून दिले होते लग्न; आता खातोय तुरुंगाची हवा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिलेचे अपहरण करून राजस्थानात बळजबरीने लग्न लावून दिल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या राजस्थानच्या नवलसिंग सिसोदिया याला जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे. 

चार दिवसांपूर्वीच गाडगेनगर पोलिसांनी बासवाडा, राजस्थान येथून नवलसिंगला अटक करून अमरावतीत आणले. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे, त्याला न्यायालयासमोर हजर केले होते. तर, स्थानिक एजंट सय्यद इमरान उर्फ राजा सय्यद अकील याला आठवड्यापूर्वीच पोलिसांनी अटक केली असून, तो शुक्रवार, 3 जुलैपर्यंत गाडगेनगर पोलिसांच्या कोठडीत आहे.

अवश्य वाचा- भीषण! विहिरीतील विषारी गॅसने पितापुत्रासह चौघांचा मृत्यू

या प्रकरणात जी पीडित महिला आहे, तिचीही तपास अधिकाऱ्यांनी भेट घेतली. तिचा पती बंगलोर (कर्नाटक) येथे राहतो. तिला बयाण देण्यासाठी अमरावती पोलिसांपुढे हजर राहण्यास सांगितले होते. तिने येण्यासाठी होकार दिला होता. ती स्वत:हून राजस्थानात गेली आणि लग्न केले, असे तिने पोलिसांना भेटीअंती सांगितले. राजस्थानच्या बासवाडा येथून साडेचारशे किलोमीटर दुर्गम भागात त्या पीडितेचे गाव आहे. तिला येण्यास विलंब लागू शकतो. 

ज्या पद्धतीने तक्रार नोंदविली गेली, त्यानुसार हे प्रकरण मानवी तस्करीत मोडते. पोलिसांच्या तपासात प्रगती आहे. इंदोर येथील रवी धारियाच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. 
- विजय यादव, 
प्रभारी पोलिस निरीक्षक गाडगेनगर ठाणे.