esakal | वडिलांचा होता अत्यसंस्कार मात्र, लॉकडाउनमुळे जाणे शक्य नव्हते म्हणून त्याने...
sakal

बोलून बातमी शोधा

video-call.jpg

माझोड येथील सुपत्र राजेश खिराळे हे भारतीय सैन्य दलात उत्तराखंड येथील रोडकी येथे कार्यरत आहेत. त्यांचे वडील गुलाबराव खिराळे हे काही दिवसांपासून आजारी होते. शुक्रवारी (ता.17) त्यांचे निधन झाले. कोरोना संसर्गाची देशाला पार्श्‍वभूमी असल्याने सर्वच धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

वडिलांचा होता अत्यसंस्कार मात्र, लॉकडाउनमुळे जाणे शक्य नव्हते म्हणून त्याने...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माझोड (जि. अकोला) : लॉकडाउमुळे विविध बाके प्रसंग निर्माण झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. तर कुठे भावनिक व्‍यथाही पुढे येत आहे. अशात येथील उत्तराखंड येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या सैनिक मुलाला लाकडाउमुळे त्यांच्या वडिलांचे अखेरचे दर्शनही घेता आले नाही. शुक्रवारी (ता.17) त्याला वडिलांचे अत्यसंस्कार ऑनलाईन बघून अश्रूंना वाट मोकळी करावी लागली.

क्लिक करा- बुलडाण्यात आणखी पाच जण कोरोना मुक्त

शुक्रवारी झाले वडिलांचे निधन
माझोड येथील सुपत्र राजेश खिराळे हे भारतीय सैन्य दलात उत्तराखंड येथील रोडकी येथे कार्यरत आहेत. त्यांचे वडील गुलाबराव खिराळे हे काही दिवसांपासून आजारी होते. शुक्रवारी (ता.17) त्यांचे निधन झाले. कोरोना संसर्गाची देशाला पार्श्‍वभूमी असल्याने सर्वच धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय शासनाकडून लॉकडाउन करण्यात आले. परिणामी दळण-वळाची सोय सुद्धा बंद आहे. सैनिक राजेश खिराळे यांना वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी गावी येत आले नाही.

हेही वाचा- सांगा आता पीक कर्ज फेडायचे कसे

अश्रू झाले अनावर
सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी खिराळे कुटुंबाला धीर देत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे अंत्यविधीच्या कार्यक्रमाला गर्दी न करता निवडक नागरिकांमध्ये अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. त्यामुळे सैनिक राजेश यांनी वडिलांची शेवटची भेट व्हावी, अंत्यसंस्कार बघता यावे अशी इच्छा आप्तेष्टांकडे बोलून दाखविली. त्यामुळे गावातील तरुणांनी राजेश यांच्या मागणीला प्रतिसाद देत ऑनलाईन प्रणालीद्वारे राजेश यांना अंत्यसंस्काराचा कार्यक्रम तसेच शेवटची भेट करून दिली. प्राणपणाने भारतमातेची सेवा करणारे राजेश आज सिमेवर आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना वडिलांच्या निधनाच्या बातमीने अश्रूअनावर झाल्याचे दिसून आले.