पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

आपल्या पत्नीचे पर पुरुषासोबत असणारे अनैतिक संबंध असह्य झाल्यामुळेे एका पाणीपुरी विक्रेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (ता.07) रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.
 

पांढरकवडा - आपल्या पत्नीचे पर पुरुषासोबत असणारे अनैतिक संबंध असह्य झाल्यामुळेे एका पाणीपुरी विक्रेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (ता.07) रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.

रुपेश अयोध्याप्रसाद पांडे (35) (रा. भगतसिंग वार्ड) असे मृतकाचे नाव असून त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत एका माजी नगरसेवकाचे नाव असल्यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे.

मृतक रुपेशचा गोपाळकृष मंदिराजवळ पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्या पत्नीचे सुरवातीपासून घरमालका बरोबर अनैतिक संबंध होते. घरमालक हा माजी नगरसेवक आहे. त्यांच्यात असलेल्या प्रेम संबंधाची माहिती उघडकीस आल्याने मागील दोन महिन्यांपूर्वी रुपेशनेे त्याच्या पत्नीला माहेरी हाकलून दिले होते. तेव्हापासून तो भगतसिंग वार्डात भाड्याने खोली करुन राहत होता.

Web Title: he suicide due to relationship outside his wife